Today Rashi Bhavishya, 25 March 2023 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष:-
कामातील उत्साह व जोम वाढेल. ग्रहमानाची अनुकूलता लाभेल. नवीन संधी उपलब्ध होतील. कागदपत्रांची नीट छाननी करावी. आवडी निवडीबाबत दक्ष राहाल.
वृषभ:-
प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. कामात अधिक आवडीने रस घ्याल. तोंडात साखर ठेवून वागाल. हौसेखातर खर्च कराल. करमणुकीचे कार्यक्रम आखाल.
मिथुन:-
अधिकारी वर्गाचा सल्ला घ्यावा. मोठ्या लोकांची गाठ घ्याल. कमिशन मधून फायदा होईल. बरेच दिवसांची सुप्त इच्छा पूर्ण होईल. संपर्काचा फायदा करून घ्याल.
कर्क:-
जोडीदाराची कमाई वाढेल. लेखक वर्गाला चांगला फायदा होईल. बुद्धिकौशल्याने मन जिंकून घ्याल. तुमचे कसब कामाला लावाल. कामात स्त्री वर्गाची मदत होईल.
सिंह:-
कलाकारांचे कौशल्य दिसून येईल. वरिष्ठांना खुश करू शकाल. खाण्यापिण्याची पथ्ये पाळावीत. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. वेळेचा योग्य सदुपयोग कराल.
कन्या:-
जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. चर्चेतून योग्य मार्ग निघेल. कौटुंबिक प्रश्न समजूतदारपणे हाताळाल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. भागीदारीत नवीन योजना आखाल.
तूळ:-
तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. जोडीदारावर तुमचा प्रभाव राहील. कमी श्रमात कामे पूर्ण करता येईल. गुंतवणुकीचा नवीन मार्ग शोधावा. देणी भागवता येतील.
वृश्चिक:-
एककल्ली विचार करू नका. अती आग्रह बरा नव्हे. जोडीदाराच्या आग्रहाला बळी पडाल. कौटुंबिक गोष्टींचे भान ठेवावे. भावंडांना मदतीचा हात पुढे कराल.
धनू:-
दिवस मनाप्रमाणे घालवाल. बोलताना सारासार विचार करावा. घरगुती कामे अंगावर पडतील. मुलांशी क्षुल्लक मतभेद संभवतात. क्षुल्लक गोष्टी फार मनाला लावून घेऊ नका.
मकर:-
उष्णतेचे विकार संभवतात. पचनास हलके पदार्थ खावेत. डोके थंड ठेवावे लागेल. फार काळजी करण्यात वेळ वाया घालवू नका. उगाचच चिडचिड करू नये.
कुंभ:-
आरोग्यात सुधारणा होईल. कामाचा आनंद घेता येईल. हातातील अधिकाराचा वापर करता येईल. घरगुती वापराच्या वस्तू खरेदी कराल. चैनीची आवड जोपासाल.
मीन:-
गप्पांमध्ये रमून जाल. हसत-हसत कामे पूर्ण कराल. निसर्ग सानिध्याची ओढ वाढेल. सामाजिक गोष्टीत हातभार लावाल. मित्रांची नाराजी गोडीने दूर करावी.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर