Surya Transit In Cancer: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन आणि नक्षत्रपरिवर्तन करतो. ज्याच्या प्रभाव मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. ग्रहांचा राजा सूर्य जुलै महिन्यात कर्क राशीमध्ये राशीपरिवर्तन करेल. ज्याचा प्रभाव काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. सूर्याच्या कर्क राशीतील प्रवेशाने काही राशीच्या व्यक्तींना त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळेल.
कर्क
सूर्याच्या कर्क राशीतील प्रवेश कर्क राशीच्या व्यक्तींसाठी खूप भाग्यकारक ठरेल. या काळात तुमचे मन प्रसन्न राहील. उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. करिअरमध्ये यश मिळेल, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल, तसेच सहकार्यांकडून मदत प्राप्त होईल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. या काळात मानसिक, शारीरिक आरोग्य उत्तम असेल. मान-सन्मान वाढेल.
कन्या
सूर्याच्या कर्क राशीतील प्रवेशाने कन्या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतील. या काळात तुमचे नशीब तुमच्या बाजूने असेल. शिक्षण क्षेत्रात हवे तसे यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरी, व्यवसायात अनपेक्षित बदल घडून येतील. आयुष्यात समाधान प्राप्त होईल. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल.
हेही वाचा: येणारे ३२ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नवी नोकरी, पगारवाढ
तूळ
तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्याच्या कर्क राशीतील प्रवेशाने आयुष्यात नवे बदल दिसून येतील. या काळात मानसन्मानात वाढ होईल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)