Guru and Shukra Yuti: ज्योतिषशास्त्रात देवतांचे गुरु बृहस्पति आणि दैत्यांचे गुरु शुक्र यांना खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. गुरु ग्रहाला ज्ञान, समृद्धी, अध्यात्माचा कारक ग्रह मानला जातो, तर शुक्र ग्रहाला भौतिक सुख, धन, ऐश्वर्याचा कारक ग्रह मानले जाते. या दोन्ही ग्रहांची युती जवळपास १२ वर्षांनंतर निर्माण होणार असून याचा प्रभाव सर्व १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर प्रकर्षाने पाहायला मिळेल. या व्यक्तींच्या आयुष्यातील आर्थिक समस्या, अडचणी सर्व काही दूर होण्यास मदत होईल.
ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रहाने १ मे २०२४ रोजी वृषभ राशीत प्रवेश केला असून शुक्र ग्रहाने देखील १९ मे रोजी सकाळी ८ वाजून ५१ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश केला होता. गुरू आणि शुक्र ग्रहाची ही युती १२ जूनपर्यंत असेल.
मेष
गुरु आणि शुक्र ग्रहाची युती मेष राशीच्या लोकांसाठीदेखील खूप लाभकारी सिद्ध होईल. युतीच्या प्रभावाने मेष राशीच्या व्यक्तींना अडकलेले पैसे परत मिळतील. आयुष्यात समाधान प्राप्त होईल. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. वाणीवर नियंत्रण राहील, ज्यामुळे लोक तुमच्यावर इंप्रेस असतील.
सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींसाठीदेखील गुरु आणि शुक्र ग्रहाची युती शुभ फलदायी सिद्ध होईल. नोकरी-व्यवसायात यश मिळेल. या राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल.
हेही वाचा: तब्बल ९७ दिवस दारी नांदणार लक्ष्मी; ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस
मकर
मकर राशीच्या व्यक्तींसाठी गुरु आणि शुक्र ग्रहाची युती खूप अनुकूल सिद्ध होईल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. मान-सन्मान आणि आत्मविश्वासात वाढ होईल. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.