Shani vakri 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. ज्यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला गोचर, मार्गी आणि वक्री असे म्हटले जाते. ग्रहांची वक्री स्थिती उलट गतीशी संबंधित असते. ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की, जे लोक नेहमी न्यायाचे पालन करतात आणि चांगले कर्म करतात अशा व्यक्तींवर शनिदेवाची सदैव कृपा असते. शनि सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून नवग्रहात न्यायप्रिय असलेले शनिदेव २९ जून रोजी वक्री होतील. जवळपास १५ नोव्हेंबरपर्यंत वक्री असतील. शनिच्या वक्री होण्याने १२ राशीतील काही राशींच्या व्यक्तींना अनेक फायदे होण्याची शक्यता आहे.
मेष
शनिदेवाची वक्री चाल मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल, आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.
वृषभ
शनिदेवाची वक्री चाल वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुम्हाल तुमच्या आई-वडिलांची खूप साथ मिळेल. धार्मिक कार्यात आनंदाने सहभागी व्हाल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी देखील शनिदेवाची वक्री चाल खूप नवे बदल घडवून आणेल. अविवाहित असाल तर लग्नाचे प्रस्ताव येतील. नोकरी-व्यापारात वाढ होईल. कामामुळे अनेकदा दूरचा प्रवास करावा लागेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल, त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल.अडचणींवर मात कराल, गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.
तूळ
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.
धनु
शनिच्या वक्री चालीमुळे धनु राशीच्या व्यक्तींना या काळात अचानक धनलाभ होईल, अडकलेले पैसे परत मिळतील. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परिक्षेत उत्तम यश मिळेल.वैवाहिक जीवन सुखमय राहिल तसेच जे अविवाहित आहेत त्यांचे लग्न ठरेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)