Tirgrahi Yog In Mithun: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशीपरिवर्तनाने अनेक शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर पडतो. १५ जून रोजी मिथुन राशीमध्ये ‘त्रिग्रही योग’ निर्माण होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा योग मिथुन राशीत तब्बल १० वर्षांनंतर निर्माण होत असून या योगाची निर्मिती बुध, शुक्र आणि सूर्याच्या युतीमुळे होईल, ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. परंतु १२ राशींपैकी तीन राशीच्या व्यक्तींवर त्रिग्रही योगाचा शुभ परिणाम पाहायला मिळेल. त्रिग्रही योगाच्या प्रभावाने या तीन राशीच्या व्यक्तींना आयुष्यात सुख-समृद्धी तसेच पद-प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते.

मिथुन

मिथुन राशीतच हा योग निर्माण होत असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींवर याचा अधिक चांगला प्रभाव पाहायला मिळेल. त्यामुळे या काळात मिथुन राशीच्या व्यक्तींना भाग्याची भरपूर साथ मिळेल. या काळात बँक बॅलन्स वाढेल. या राशीच्या व्यक्तींची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. मान-सन्मान आणि आत्मविश्वासात वाढ होईल. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींना देखील त्रिग्रही योगामुळे आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतील. या काळात तुमचे नशीब तुमच्या बाजूने असेल. शिक्षण क्षेत्रात हवे तसे यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरी, व्यवसायात अनपेक्षित बदल घडून येतील. आयुष्यात समाधान प्राप्त होईल. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. वाणीवर नियंत्रण राहील; ज्यामुळे लोकांवर प्रभाव पडेल.

हेही वाचा: नुसती चांदीच चांदी! २२ दिवसांनंतर शनि होणार वक्री; पुढचे पाच महिने असणार ‘या’ तीन राशींवर देवी लक्ष्मीचा वरदहस्त

तूळ

त्रिग्रही योग तूळ राशीच्या व्यक्तींसाठी देखील खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमचे मन धार्मिक कार्यात अधिक रमेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. कुटुंबीयांकडून मदत मिळेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)