Gajakesari Raja Yoga: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनाने अनेकदा शुभ योग निर्माण होतात, ज्याचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात गजकेसरी राजयोगाला खूप शुभ मानलं जातं. गुरु आणि चंद्र एका राशीत असल्यास हा राजयोग निर्माण होतो. तब्बल १२ वर्षांनंतर १४ जून रोजी कन्या राशीत गुरु आणि चंद्राच्या संयोगामुळे हा राजयोग निर्माण झाला आहे. चंद्राने १४ जून रोजी सकाळी कन्या राशीत प्रवेश केला असून १६ जूनपर्यंत तो या राशीत राहील. यावेळी चंद्रावर गुरुची पंचम दृष्टी पडेल, ज्यामुळे हा राजयोग निर्माण होईल.
मिथुन
मिथुन राशीच्या चौथ्या घरात चंद्र प्रवेश करेल. हा काळ तुमच्यासाठी खूप लाभकारी असेल. या काळात तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. मिथुन राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल. उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. समाजात तुमची लोकप्रियता वाढेल.
कर्क
गजकेसरी राजयोगाचा प्रभाव कर्क राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल ठरेल. या काळात आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. लोक तुमच्यावर इंप्रेस होतील. करिअरमध्ये हवे तसे यश मिळेल. आरोग्य समस्या दूर होतील. मेहनीचे पूर्ण फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे.
हेही वाचा: ११८ दिवस गुरुचा प्रभाव; ‘या’ चार राशींच्या घरी नांदणार लक्ष्मी; कमवाल बक्कळ पैसा
धनु
धनु राशीच्या व्यक्तींना गजकेसरी राजयोगाचे शुभ परिणाम पाहायला मिळतील. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवन सुखमय असेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. कुटुंबातून आनंदी वार्ता येतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळवाल. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)