Raj Yog: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे वेळोवेळी राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन पाहायला मिळते; ज्यांचा प्रभाव प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. जून महिन्यामध्येही बऱ्याच ग्रहांचे राशी परिवर्तन झाले आहे. या राशी परिवर्तनामुळे जवळपास ५०० वर्षांनंतर एकत्र पाच राजयोग निर्माण झाले आहेत. त्यात वृषभ राशीतील बुध आणि सूर्याच्या राशी परिवर्तनाने ‘बुधादित्य राजयोग’ निर्माण झाला आहे आणि न्यायदेवता शनी आपल्या स्वराशी असलेल्या कुंभ राशीत ‘शश महापुरुष’ राजयोग; तर शुक्र ग्रह आपल्या स्वराशी असलेल्या वृषभ राशीत ‘मालव्य राजयोग’ निर्माण करीत आहे.

तसेच वृषभ राशीत असलेल्या बुध व शुक्र ग्रहांच्या युतीमुळे ‘लक्ष्मी नारायण राजयोग’ तयार होत आहे आणि शुक्र व गुरूच्या वृषभ राशीतील संयोगाने या राशीत ‘गजलक्ष्मी राजयोग’देखील तयार होत आहे. हे पाच राजयोग निर्माण होत आहेत; ज्यामुळे काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार आहे.

मेष

पाच राजयोग मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर सिद्ध होतील. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. सोबतच प्रतिष्ठित लोकांसोबत ओळख होईल; ज्याचा भविष्यात खूप फायदा होईल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. वडिलांकडून मदत मिळेल.

वृषभ

पाच राजयोगांपैकी चार राजयोग वृषभ राशीतच निर्माण होत आहेत. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. या राशीच्या व्यक्तींची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. मान-सन्मान आणि आत्मविश्वासात वाढ होईल. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.

हेही वाचा: सूर्य देणार भरपूर पैसा! १५ जूनपासून ‘या’ तीन राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीदेखील पाच राजयोग खूप शुभ फळ देतील. या काळात आकस्मिक धनलाभ होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. भौतिक सुखाची प्राप्ती होईल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)