Surya gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन आणि नक्षत्रपरिवर्तन करतो. ग्रहांचा राजा सूर्य जुलै महिन्यात कर्क राशीमध्ये राशीपरिवर्तन करेल, ज्याचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. सूर्याच्या कर्क राशीतील प्रवेशाने काही राशींच्या व्यक्तींना त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळेल.

सध्या सूर्य मिथुन राशीत असून १६ जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या कर्क राशीतील प्रवेशाने १२ राशीतील काही राशींच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील.

मिथुन

सूर्याचा कर्क राशीतील प्रवेश मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप भाग्यकारक ठरेल. या काळात तुमचे मन प्रसन्न राहील. या काळात मानसिक, शारीरिक आरोग्य उत्तम असेल. मानसन्मान वाढेल. उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. करिअरमध्ये यश मिळेल, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल, तसेच सहकार्यांकडून मदत प्राप्त होईल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्याच्या कर्क राशीतील प्रवेशाने आयुष्यात नवे बदल दिसून येतील. या काळात मानसन्मानात वाढ होईल. प्रेमसंबंध सुखमय होतील. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.

हेही वाचा: पुढचे सहा महिने देवी लक्ष्मीची कृपा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती कमावणार बक्कळ पैसा

मीन

सूर्याच्या कर्क राशीतील प्रवेशाने मीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक बदल दिसून येतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात तुमचे नशीब तुमच्या बाजूने असेल. शिक्षण क्षेत्रात हवे तसे यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरी, व्यवसायात अनपेक्षित बदल घडून येतील. आयुष्यात समाधान प्राप्त होईल. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)