Surya Rashi Parivartan: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे वेळोवेळी राशीपरिवर्तन आणि नक्षत्रपरिवर्तन होते, ज्याचा प्रभाव सर्व राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ग्रहांचा राजा सूर्याने १५ जून रोजी मिथुन राशीत प्रवेश केला असून, या राशीत आधीपासून बुध ग्रहानेदेखील प्रवेश केला होता, ज्यामुळे या राशीत ‘बुधादित्य राजयोग’ निर्माण झाला आहे. सूर्य येत्या १६ जुलैपर्यंत याच राशीत विराजमान असेल, त्यानंतर सूर्य कर्क राशीत प्रवेश करेल. तोपर्यंत १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींना त्याचा अधिक फायदा होईल.
मेष
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या मिथुन राशीतील प्रवेशाने मेष राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ होईल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
सिंह
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या मिथुन राशीतील राशी परिवर्तनाने सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक बदल होतील. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
कन्या
सूर्याच्या मिथुन राशीतील राशी परिवर्तनाने कन्या राशीच्या व्यक्तींना या काळात आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. लोक तुमच्यावर इंप्रेस होतील. करिअरमध्ये हवे तसे यश मिळेल. आरोग्य समस्या दूर होतील. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. नवीन गोष्टी शिकण्याच्या संधी मिळतील. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे.
तूळ
सूर्याच्या मिथुन राशीतील राशीपरिवर्तनाने तूळ राशीच्या व्यक्तींना शुभ परिणाम पाहायला मिळतील. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवन सुखमय असेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.
हेही वाचा: शनिची होणार कृपा! पुढचे २५७ दिवस ‘या’ तीन राशीचे लोक कमावणार बक्कळ पैसा
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या व्यक्तींनादेखील सूर्याच्या मिथुन राशीतील राशीपरिवर्तनाने सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लॅनदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)