Gajkasari Yog 2024: ज्योतिषशास्त्रानुसार देवगुरु बृहस्पति जवळपास एका वर्षानंतर राशीपरिवर्तन करतात. गुरु ग्रहाच्या राशीपरिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. सध्या देवगुरु बृहस्पति वृषभ राशीत विराजमान असून त्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. तसेच चंद्र ग्रह अडीच दिवसात एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. त्यामुळे प्रत्येक महिन्यात चंद्र एका राशीत तीन ते चार वेळा राशीपरिवर्तन करते.
ज्योतिषशास्त्रानुसार वृषभ राशीमध्ये चंद्राने ४ जून रोजी प्रवेश केला असून ज्यामुळे या राशीत चंद्र आणि गुरू राशीच्या युतीमुळे ‘गजकेसरी राजयोग’ निर्माण होत आहे. या राजयोगामुळे काही राशीच्या लोकांना त्याचा खूप फायदा होईल. चंद्र वृषभ राशीत ४ जून रोजी प्रवेश केला असून तो ७ जूनपर्यंत या राशीत असणार आहे. त्यामुळे या काळात काही राशींच्या व्यक्तींना त्याचा खूप फायदा आहे.
मेष
वृषभ राशीत निर्माण होत असलेल्या गजकेसरी योगामुळे मेष राशीच्या व्यक्तींच्या वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी नांदेल. त्याचबरोबर कुटुंबातील इतर सदस्यांबरोबर नातेसंबंध सुधारेल. या काळात या लोकांच्या आयुष्यात आर्थिक स्थिरता दिसून येईल. व्यवसायात आकस्मित धनलाभ होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. ताण-तणाव दूर होण्यास मदत होईल.
कन्या
चंद्र आणि गुरु ग्रहाच्या प्रभावाने कन्या राशीच्या व्यक्तींना अडकलेले पैसे परत मिळतील. आयुष्यात समाधान प्राप्त होईल. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. वाणीवर नियंत्रण राहील, ज्यामुळे लोक तुमच्यावर इंप्रेस असतील. करिअरमध्ये हवे तसे यश मिळेल. आरोग्य समस्या दूर होतील.
हेही वाचा: सूर्य करणार मालामाल! नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ पाच राशींना मिळणार सुख, समृद्धी अन् संपत्ती
तूळ
गजकेसरी राजयोगामुळे तूळ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. वैवाहिक जीवन सुखमय होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)