Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार ज्यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला गोचर, मार्गी आणि वक्री असे म्हटले जाते. ग्रहांची वक्री स्थिती उलट गतीशी संबंधित असते. शनि सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून ३० जून रोजी वक्री होईल. शनिची वक्री चाल काही राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तर काहीच्या राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ फारसा अनुकूल राहणार नाही. तसेच काही राशीच्या व्यक्तींसाठी शनिची वक्री चाल अत्यंत लाभदायी सिद्ध होईल.

मेष

मेष राशीच्या व्यक्तींसाठी शनिची चाल खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी देखील शनिची वक्री चाल खूप नवे बदल घडवून आणेल. या काळात मिथुन राशीच्या व्यक्तींचे वैवाहिक जीवन सुखमय असेल. अविवाहित असाल तर लग्नाचे प्रस्ताव येतील. नोकरी-व्यापारात वाढ होईल. कामामुळे अनेकदा दूरचा प्रवास करावा लागेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल, त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. अडकलेले पैसे परत मिळतील.

सिंह

शनिची वक्री चाल सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुम्हाल तुमच्या आई-वडिलांची खूप साथ मिळेल. धार्मिक कार्यात आनंदाने सहभागी व्हाल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.

हेही वाचा: पैशांचा पाऊस पडणार! एक वर्षानंतर तयार होतोय ‘भद्र महापुरुष योग’; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय

धनु

धनु राशीच्या व्यक्तींसाठी शनिची वक्री चाल शुभ परिणाम देईल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. या राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहील, फक्त मेहनत कायम ठेवा.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)