Surya Gochar 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते, ज्याचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मानसन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.

सध्या सूर्य वृषभ राशीत असून, १५ जून रोजी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करील; जो १७ जुलैपर्यंत या राशीत राहील. सूर्याच्या मिथुन राशीतील प्रवेशाने काही राशींच्या व्यक्तींना त्याचा विशेष लाभ होईल. या काळात त्या व्यक्तींच्या आयुष्यात मानसन्मान वाढेल.

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Ketu Gochar 2024
Ketu Gochar 2024 : केतु ग्रहाने केला सूर्याच्या नक्षत्रात प्रवेश, ‘या’ तीन राशींना मिळणार अचानक पैसाच पैसा!
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश
१९ नोव्हेंबरला होऊ शकतो या राशींचा भाग्योदय! ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, प्रत्येक कामात मिळणार यश

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्याचा मिथुन राशीतील प्रवेश खूप खास ठरेल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

मिथुन

सूर्य मिथुन राशीतच प्रवेश करणार आहे त्यामुळे या राशीच्या व्यक्तींसाठी खूप हा काळ खूप खास ठरणार आहे. हा काळ या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभ कार्य होतील, आरोग्याच्या तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींसाठीदेखील सूर्याचे राशी परिवर्तन सकारात्मक बदल घेऊन येईल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल, फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.

वृश्चिक

सूर्याचा मिथुन राशीतील प्रवेश वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप भाग्यकारक ठरेल. या काळात तुमचे मन प्रसन्न राहील. उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. करिअरमध्ये यश मिळेल, कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल, तसेच सहकार्यांकडून मदत प्राप्त होईल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. या काळात मानसिक, शारीरिक आरोग्य उत्तम असेल.

हेही वाचा: पैसाच पैसा! १४ जूनला निर्माण होणार ‘लक्ष्मी नारायण योग’; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा

धनु

सूर्याच्या मिथुन राशीतील राशी परिवर्तनाने धनु राशीच्या व्यक्तींना या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता.