Transit of Venus: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे त्यांच्या ठरावीक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. त्यात कधी शुभ परिणाम; तर कधी अशुभ परिणाम पाहायला मिळतो. जूनप्रमाणेच जुलै महिन्यातही काही ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. भौतिक सुख आणि सुख, समृद्धीचा कारक असलेल्या शुक्र ग्रहाने १२ जून रोजी मिथुन राशीत प्रवेश केला होता. तो ७ जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश करील. त्यामुळे काही राशींच्या व्यक्तींना त्याचा अधिक चांगला फायदा होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष

मेष राशीच्या व्यक्तींना शुक्राच्या राशी परिवर्तनाने शुभ परिणाम पाहायला मिळतील. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

मिथुन

शुक्राच्या राशी परिवर्तनाने मिथुन राशीच्या व्यक्तींना आयुष्यात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. हा काळ मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप सकारात्मक ठरेल. या काळात शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

कर्क

कर्क राशीतच शुक्राचे राशी परिवर्तन होणार आहे; ज्यामुळे हा काळ या राशीच्या लोकांसाठी खूप अनुकूल असेल. आयुष्यातील अनेक अडथळे सहज दूर होतील. सुख-समृद्धीत वाढ होईल. अनेकांना पदोन्नती मिळेल; तर काहींना नव्या नोकरीची संधी चालून येईल. आरोग्यही चांगले असेल. आपल्या मुलांसोबत सहलीची योजना तयार कराल.

हेही वाचा: ३० दिवस असणार देवी लक्ष्मीची कृपा! सूर्याच्या राशीपरिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भरपूर पैसा

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्राच्या राशी परिवर्तनाने खूप सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत सहलीची योजनादेखील तयार कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Horoscope goddess lakshmi transit of venus in cancer in july the persons of these four zodiac signs will get happy sap