Guru Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला देवांचे गुरू मानले जाते, जो एका विशिष्ट कालावधीनंतर राशिबदल करतो. पण, गुरू ग्रह आता सुमारे एक वर्षानंतर राशिबदल करणार आहे, ज्यामुळे त्याचा १२ राशींवर परिणाम दिसून येईल. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू सध्या वृषभ राशीत आहे; परंतु १४ मे रोजी गुरू वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करील. या वर्षी गुरू ग्रह एका राशीत सुमारे एक वर्ष राहण्याऐवजी वर्षभरात तीनदा राशिबदल करील. मिथुन राशीनंतर तो कर्क राशीत प्रवेश करील आणि नंतर पुन्हा मिथुन राशीत येईल. गुरू ग्रहाच्या राशिबदलामुळे काही राशींच्या लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम होईल, त्यांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश आणि आर्थिक लाभ मिळू शकतो. या भाग्यशाली राशींविषयी जाणून घेऊ…

गुरुचा राशी बदल ‘या’ तीन राशींसाठी ठरेल फलदायी (Guru Gochar 2025)

मिथुन

गुरूचा राशिबदल मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ सिद्ध ठरू शकतो. या काळात मिथुन राशीच्या लोकांना मुलांचे सुख मिळू शकते. तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. त्यासह मुलांशी संबंधित दीर्घ काळापासूनच्या समस्याही सुटतील. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारे लोक आता यश मिळवू शकतात. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. त्याशिवाय, विवाहित लोकांच्या वैवाहिक जीवनातील दीर्घ काळापासूनच्या समस्या आता सोडविता येतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवता येईल. समाजात आदर, मान-सन्मान वाढेल. तसेच, तुमची आर्थिक परिस्थितीही सुधारू शकते.

सिंह

गुरूचा मिथुन राशीतील प्रवेश सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होऊ शकते. एखाद्याला दिलेले पैसे परत मिळू शकतात. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते. त्यासह तुमची आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते. वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या समस्या संपतील. त्याशिवाय गुरूच्या कृपेने विवाहाचे चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता निर्माण होत आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती बरीच मजबूत होऊ शकेल.

तूळ

प्रत्येक क्षेत्रात तूळ राशीच्या लोकांना अपार यश मिळू शकते; तसेच आर्थिक लाभही मिळू शकतो. समाजात आदर वाढेल. त्यासह आर्थिक परिस्थितीशी निगडित दीर्घ काळापासूनच्या समस्याही संपतील. तुमचा कल अध्यात्माकडेही अधिक असेल. अशा परिस्थितीत तुम्ही विविध कार्यक्रमांमध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी व्हाल आणि तुमच्या भावंडांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. त्यासह नोकरी करणाऱ्या गुरू ग्रहाचे भ्रमणदेखील फायदेशीर ठरू शकते. पगारवाढीबरोबरच पदोन्नतीचीही शक्यता आहे. तुम्हाला मुलांचे सुख मिळेल. त्याशिवाय आरोग्य चांगले राहणार आहे.