Mangal Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला साहस, पराक्रम, शौर्य, क्रोध, भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे ज्या व्यक्तीच्या पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो, असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सक्षम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका निश्चित काळानंतर राशी परिवर्तन करतो. अनेकदा याचा फायदा काही राशींच्या व्यक्तींना होतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळ ग्रहाने १ जून रोजी मेष राशीत प्रवेश केला होता, या राशी परिवर्तनानंतर मंगळ येत्या १२ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करील. या राशीत मंगळ २६ ऑगस्टपर्यंत उपस्थित राहील. मंगळाचा वृषभ राशीतील प्रवेश १२ राशींपैकी काही राशीच्या लोकांसाठी खूप खास असेल.

मेष

मंगळाचा वृषभ राशीतील प्रवेश मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल सिद्ध होईल. या काळात अनेक आर्थिक लाभ होतील. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल.

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी देखील मंगळाचा वृषभ राशीतील प्रवेश खूप सकारात्मक सिद्ध होईल. या काळात तुमच्यात साहस, पराक्रम वाढेल. या काळात त्यांची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. अविवाहितांची लग्ने जुळतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल.

हेही वाचा: आता नुसती चांदी! गुरूच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ पाच राशीधारकांना मिळणार पद, प्रतिष्ठा अन् पैसा

कुंभ

मंगळाचा वृषभ राशीतील प्रवेश कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ असेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

(टीप – सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Horoscope mars enter the sign of taurus the fortune of these three signs will shine sap