Mercury in Taurus: ज्योतिषशास्त्रात वेळोवेळी ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होताना दिसते. ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धी, तर्क, वाणी, संवाद यांचा कारक ग्रह मानले जाते. तसेच ग्रहांचा राजकुमार, असेदेखील या ग्रहाचे वर्णन केले जाते. ३१ मे रोजी बुध ग्रहाचे मेष राशीतून वृषभमध्ये राशी परिवर्तन झाले असून, १४ जूनपर्यंत बुध ग्रह याच राशीत राहील. त्यानंतर तो मिथुन राशीत प्रवेश करील. बुध ग्रहाचे वृषभ राशीत झालेले परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. त्या प्रभावाने त्या राशीच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदेल.

मेष

मेष राशीच्या लोकांना बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनाने कामात यश-कीर्ती प्राप्त होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नोकरी, व्यवसायात अनपेक्षित बदल घडून येतील. आयुष्यात समाधान प्राप्त होईल. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. वाणीवर नियंत्रण राहील; ज्यामुळे लोकांवर प्रभाव पडेल.

मिथुन

बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे मिथुन राशीच्या लोकांना अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील. या काळात या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल.

सिंह

बुध ग्रहाचे राशी परिवर्तन तुमच्या राशीसाठी खास असेल. या काळात तुमच्या आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. मान-सन्मान आणि आत्मविश्वासात वाढ होईल. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

तूळ

बुध ग्रहाचे राशी परिवर्तन तूळ राशीच्या लोकांसाठी खूप खास असेल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक अनपेक्षित बदल घडून येतील. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक संकटांवर तुम्ही सहज मात कराल, धन-संपत्तीचे सुख मिळेल. तसेच उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. समाजात मानसम्मान वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल.

हेही वाचा: आता नुसती चांदी! १२ वर्षांनंतर गुरू आणि शुक्र ग्रहाची होणार युती; ‘या’ तीन राशींच्या धनसंपत्तीत होणार वाढ

वृश्चिक

बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडून येतील. या काळात नोकरदार व्यक्तींना पदोन्नती मिळेल. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल. सर्वांसोबत चांगले संबंध निर्माण होतील आणि जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल.

Story img Loader