Saturn Transit: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशी परिवर्तनासोबत त्यांचे नक्षत्र परिवर्तनदेखील होते. शनी ग्रहाला न्याय आणि कर्माची देवता म्हणून ओळखले जाते. २०२४ मध्ये शनी कुंभ राशीत विराजमान असेल. ज्योतिषशास्त्रानुसार शनी सर्वांत मंद गतीने चालणारा ग्रह आहे. कुंडलीत शनी शुभ स्थानी असल्यास व्यक्तीला आयुष्यात कुठल्याच समस्यांचा सामना करावा लागत नाही; पण शनि अशुभ स्थितीत असल्यास व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. पुढच्या वर्षी २८ फेब्रुवारीच्या दिवशी शनीचा अस्त होईल. त्यामुळे पुढच्या २६८ दिवसांपर्यंत शनीची शुभ दृष्टी काही राशीच्या व्यक्तींवर राहील.

ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की, जे लोक नेहमी न्यायाचे पालन करतात आणि चांगले कर्म करतात अशा व्यक्तींवर शनिदेवाची सदैव कृपा असते.

Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ
Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
Mangal Gochar 2025
२०२५ मध्ये मंगळ सात वेळा बदलणार राशी, ‘या’ दोन प्रिय राशींना होणार अपार धनलाभ
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये नुसता पैसा; मंगळ होणार मार्गी ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् मानसन्मान
Saphala Ekadashi 2024
वर्षातील शेवटच्या एकादशीच्या दिवशी ‘या’ चार राशींना होणार मोठा धन लाभ, माता लक्ष्मीच्या कृपेने मिळणार अपार पैसा
Rahu Gochar in Kumbh Rashi
२०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; राहूच्या राशी परिवर्तनाने येणार गडगंज श्रीमंती

मेष

कुंभ राशीमध्ये शनी ग्रहाचा उदय मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात मेष राशीच्या व्यक्तींचे वैवाहिक जीवन सुखमय असेल. अविवाहित असाल, तर लग्नाचे प्रस्ताव येतील. नोकरी-व्यापारात वाढ होईल. कामामुळे अनेकदा दूरचा प्रवास करावा लागेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल, त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. अडकलेले पैसे परत मिळतील.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठीही हा काळ खूप शुभ अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

हेही वाचा: पुढचे २ दिवस बक्कळ पैसा; चंद्र-गुरु निर्माण करणार ‘गजकेसरी राजयोग’, ‘या’ तीन राशी होणार मालामाल

तूळ

या काळात तूळ राशीच्या व्यक्तींना आई-वडिलांची खूप साथ मिळेल. धार्मिक कार्यात आनंदाने सहभागी व्हाल. २६८ दिवसांच्या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader