Rahu nakshatra parivartan: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ठराविक वेळेनंतर ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. या राशी परिवर्तनाचा प्रभाव प्रत्येक राशीवर पाहायला मिळतो. नवग्रहांत राहूला मायावी ग्रह म्हटले जाते. जो प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा कायापालट करू शकतो. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी राहू ग्रहाने मीन राशीत प्रवेश केला होता. राहू केवळ दीड वर्षातून एकदा आपली चाल बदलतो. सध्या राहू मीन राशीत विराजमान असून, तो मे २०२५ पर्यंत याच राशीमध्ये राहणार आहे. त्यानंतर राहू शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करेल. तसेच लवकरच राहू नक्षत्र परिवर्तन करणार आहे. सध्या राहू रेवती नक्षत्रामध्ये असून ८ जुलै रोजी तो उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. हे नक्षत्र शनिचे आहे. वर्षाच्या शेवटपर्यंत राहू या नक्षत्रात राहिल. हा २२० दिवसांचा काळ काही राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा