Saturn Transit 2024: ज्योतिषशास्त्रानुसार शनी ग्रहाला न्याय आणि कर्माची देवता म्हणून ओळखले जाते. शनीची ज्या राशींवर शुभ दृष्टी असते, त्या व्यक्तींना आयुष्यात जास्त संघर्षाचा सामना करावा लागत नाही. सध्या शनी त्याची स्वराशी असलेल्या कुंभ राशीत विराजमान आहे आणि नुकत्याच काही दिवसांपूर्वी शनी या राशीत वक्री झाला असून, येणारे २६८ दिवस शनी याच राशीतच उपस्थित असणार आहे. त्यामुळे या काळात काही राशीधारकांना अनेक शुभ फळांची प्राप्ती होईल.
मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी पुढचे २६८ दिवस खूप अनुकूल असतील. या काळात मिथुन राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसायात यश मिळेल. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. भाग्य तुमच्या बाजूने असेल. दूरचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. या काळात अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल.
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींसाठीही पुढचे २६८ दिवस खूप लाभदायी सिद्ध होतील. या काळात धनलाभ होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात काही अडचणी येतील; पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल.
तूळ
पुढचे २६८ दिवस तूळ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल असणार आहेत. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल.
धनू
धनू राशीच्या व्यक्तींसाठीही पुढचे २६८ दिवस खूप सकारात्मक सिद्ध होतील. या काळात तुमचे वैवाहिक जीवन सुखमय राहील. मान-सन्मानात वाढ होईल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. तीर्थक्षेत्रांना भेटी द्याल. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)