Saturn Moon conjunction: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतात. सध्या शनी देव कुंभ राशीत विराजमान आहेत. या राशीत २६ जून रोजी चंद्र प्रवेश करणार आहे जो २७ जूनपर्यंत या राशीत राहील. चंद्राच्या राशी परिवर्तनाने कुंभ राशीत शनी आणि चंद्राची युती निर्माण होईल; जेव्हा शनी आणि चंद्राची युती होते तेव्हा ‘शशि योग’ निर्माण होतो. ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींना पाहायला मिळेल. या काळात त्या राशीच्या व्यक्तींना अनेक सुख, सुविधा प्राप्त होतील, शिवाय आर्थिक अडचणी देखील दूर होतील.

मिथुन

शनि आणि चंद्राच्या युतीमुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना आयुष्यात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. हा काळ मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप सकारात्मक ठरेल. या काळात शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

धनु

धनु राशीच्या व्यक्तींसाठी शनी आणि चंद्राची युती अनुकूल सिद्ध होईल; हा काळ या राशीच्या लोकांसाठी खूप सुखद असेल. आयुष्यातील अनेक अडथळे सहज दूर होतील. सुख-समृद्धीत वाढ होईल. अनेकांना पदोन्नती मिळेल; तर काहींना नव्या नोकरीची संधी चालून येईल. आरोग्यही चांगले असेल. आपल्या मुलांसोबत सहलीची योजना तयार कराल.

मकर

मकर राशीच्या लोकांसाठीदेखील शनी आणि चंद्राची युती अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.

हेही वाचा: नवी नोकरी, भरपूर पैसा; शनी-मंगळाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींना देखील शनी आणि चंद्राच्या युतीमुळे शुभ परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक बदल होतील. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)