Saturn Transit 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. ज्यावेळी ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला गोचर, मार्गी आणि वक्री असे म्हटले जाते. ग्रहांची वक्री स्थिती उलट गतीशी संबंधित असते. शनि सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून नवग्रहात न्यायप्रिय असलेले शनिदेव ३० जून रोजी वक्री होतील, ते जवळपास १५ नोव्हेंबरपर्यंत वक्री असतील. शनिच्या वक्री होण्याने १२ राशीतील काही राशींच्या व्यक्तींना अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी शनिदेवाची वक्री चाल खूप नवे बदल घडवून आणेल. या काळात कन्या राशीच्या व्यक्तींचे वैवाहिक जीवन सुखमय असेल. अविवाहित असाल तर लग्नाचे प्रस्ताव येतील. नोकरी-व्यापारात वाढ होईल. कामामुळे अनेकदा दूरचा प्रवास करावा लागेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल, त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. अडचणींवर मात कराल, गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.

वृश्चिक

शनिदेवाची वक्री चाल वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला तुमच्या आई-वडिलांची खूप साथ मिळेल. धार्मिक कार्यात आनंदाने सहभागी व्हाल. तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.

हेही वाचा: सूर्य करणार कमाल, तुम्ही होणार मालामाल; नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शनिची वक्री चाल खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)