Shani Vakri: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठरावीक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून, काही तासांत शनी वक्री होईल, तसेच जवळपास १५ नोव्हेंबरपर्यंत म्हणजे तब्बल १३९ दिवस शनी वक्री असेल. शनीच्या वक्री होण्याने १२ राशींतील काही राशींच्या व्यक्तींना अनेक फायदे होण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की, जे लोक नेहमी न्यायाचे पालन करतात आणि चांगले कर्म करतात, अशा व्यक्तींवर शनिदेवाची सदैव कृपा असते.
मेष
शनिदेवाची वक्री चाल मेष राशीच्या व्यक्तींसाठी पुढील चार महिने खूप लाभकारी सिद्ध होईल, आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात काही अडचणी येतील; पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल.
धनू
पुढचे चार महिने शनीच्या वक्री चालीमुळे धनू राशीच्या व्यक्तींना या काळात अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल.
हेही वाचा: सूर्याचा जबरदस्त प्रभाव! सिंह राशीतील प्रवेशाने ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार भरपूर पैसा
सिंह
पुढील चार महिने सिंह राशीच्या व्यक्तींसाठीही खूप उत्तम ठरतील. या काळात सिंह राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)