Surya Rashi Parivartan: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन आणि नक्षत्रपरिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. जवळपास एक वर्षानंतर ग्रहांचा राजा सूर्य आपल्या स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचा सिंह राशीतील प्रवेश नेहमी खूप खास मानला जातो. याच्या प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या सूर्य मिथुन राशीत असून १६ जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करील. तसेच १६ ऑगस्ट रोजी सूर्य त्याच्या स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करील, या राशीत तो १७ सप्टेंबरपर्यंत उपस्थित असेल.

मेष

मेष राशीच्या व्यक्तींना सूर्याच्या सिंह राशीतील राशी परिवर्तनाने अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात मान-सन्मान मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. या काळात मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.

कर्क

सूर्याचा सिंह राशीतील प्रवेश कर्क राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी असेल. हा काळ या राशीच्या लोकांसाठी खूप अनुकूल असेल. आयुष्यातील अनेक अडथळे सहज दूर होतील. सुख-समृद्धीत वाढ होईल. अनेकांना पदोन्नती मिळेल; तर काहींना नव्या नोकरीची संधी चालून येईल. आरोग्यही चांगले असेल.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्याच्या सिंह राशीतील प्रवेशाने अनेक उत्तम फळ मिळतील. हा काळ तूळ राशीच्या व्यक्तींसाठी खूप सकारात्मक ठरेल. या काळात व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तुमच्या भावंडांची साथ तुम्हाला मिळेल. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

हेही वाचा: आता नुसता पैसा! एक वर्षानंतर कर्क राशीत निर्माण होणार ‘लक्ष्मीनारायण योग’; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा

मीन

मीन राशीच्या व्यक्तींसाठी देखील सूर्याचे राशी परिवर्तन शुभ परिणाम देणारे ठरेल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना करिअरमध्ये यश मिळेल. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Horoscope sun entering the leo sign these four sign persons will get a lot of money sap