Venus and Sun Yuti: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र राशी परिवर्तन करतो. ज्याचा प्रभाव प्रत्येक राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. जुलै महिन्यात ग्रहांचा राजा सूर्य आणि भौतिक सुखाचा कारक शुक्र ग्रह कर्क राशीत प्रवेश करतील. या दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे काही राशीच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील.
ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्य आणि शुक्र ग्रहाची युती निर्माण होते, तेव्हा त्या राशीत ‘शुक्रादित्य राजयोग’ निर्माण होतो. या शुभ योगाच्या निर्माणाने अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील.
कर्क
‘शुक्रादित्य राजयोग’ कर्क राशीतच निर्माण होत असल्यामुळे या राशीच्या व्यक्तींना हा काळ खूप अनुकूल सिद्ध होईल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. या काळात शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा काळ खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ या राशीच्या लोकांसाठी खूप सुखद असेल. आयुष्यातील अनेक अडथळे सहज दूर होतील. सुख-समृद्धीत वाढ होईल. अनेकांना पदोन्नती मिळेल; तर काहींना नव्या नोकरीची संधी चालून येईल. आरोग्यही चांगले असेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा: नुसता पैसाच पैसा! मिथुन राशीत त्रिग्रही योग; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना बनवणार धनवान
तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठीदेखील सूर्य आणि शुक्राची युती अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)