Grah Gochar May 2024: ज्योतिषशास्त्रानुसार मे महिना अत्यंत खास असणार आहे. कारण- या महिन्याच्या सुरुवातीलाच देवगुरू बृहस्पतींचे राशीपरिवर्तन होणार आहे. १ मे रोजी गुरू ग्रह मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार असून, ३ मे रोजी अस्त होईल. त्यानंतर १० मे रोजी बुध मेष राशीत, १४ मे रोजी सूर्य वृषभ राशीत व १९ मे रोजी शुक्र वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच मीन राशीत सध्या राहू आणि मंगळ ग्रहाची युती झालेली आहे. ग्रहांचे हे राशीपरिवर्तन १२ राशींतील काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्यातील ग्रहांच्या राशीपरिवर्तनासह अनेक शुभ योगदेखील निर्माण होतील. त्यात गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होत आहे; तर वृषभ राशीतील गुरु, शुक्राच्या युतीमुळे गजलक्ष्मी योग निर्माण होत आहे. वृषभ राशीतील शुक्र, सूर्य यांच्या युतीमुळे शुक्रादित्य योग, तसेच राहू व मंगळ यांच्या युतीमुळे अंगारक योग निर्माण होत आहे. हे योग काही राशींच्या व्यक्तींसाठी उत्तम ठरतील.
मे महिन्यातील राजयोग या राशींसाठी खास
वृषभ
मे महिना वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप खास असणार आहे. कारण- या राशीमध्ये गुरू ग्रह प्रवेश करणार आहे; ज्याच्या प्रभावाने या राशीत गजलक्ष्मी, गजकेसरी, शुक्रादित्य हे योग निर्माण होतील. त्यामुळे या काळात या राशीच्या व्यक्तींना भाग्याची पूर्ण साथ मिळेल. त्यांची अडकलेली कामे पूर्ण होतील. नवीन नोकरी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. या काळात तुमचे आरोग्यही उत्तम राहील.
हेही वाचा : आता पैसाच पैसा! सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने पुढच्या १४ दिवसांत ‘या’ राशी होणार मालामाल
सिंह
सिंह राशींच्या व्यक्तींसाठीही मे महिना खूप खास असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक सुख, सुविधा प्राप्त होतील. अचानक धनलाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी, व्यवसायामध्ये यश मिळेल; तसेच गुंतवणूक करणेही फायदेशीर ठरेल.
कुंभ
कुंभ राशींच्या व्यक्तींसाठीही हा महिना खूप उत्तम सिद्ध होईल. या महिन्यात तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणींवर मात होईल. शुभ ग्रहाच्या युतीमुळे कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरी, व्यवसाय यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठीदेखील हा काळ उत्तम आहे. कुटुंबातील जुने वाद मिटतील; ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवनदेखील सुखमय असेल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)