Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार केतूला मायावी ग्रह, असे म्हटले जाते. शनी-राहूप्रमाणेच केतूचादेखील लोकांच्या आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. राहू आणि केतूचे गोचर जवळपास दीड वर्षातून होते; हे दोन्ही ग्रह नेहमी प्रतिगामी म्हणजे विरुद्ध दिशेने चालतात. केतू ग्रहाच्या राशी परिवर्तनासोबतच केतूचे नक्षत्र परिवर्तनदेखील खूप खास मानले जाते. ८ जुलै रोजी केतूने हस्त नक्षत्राच्या तिसऱ्या चरणातून दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश केला; ज्याचा प्रभाव आता १२ राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.
केतू नक्षत्र परिवर्तन (Ketu Nakshatra Transit)
मेष (Aries Rashi Bhavishya)
केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष राशीच्या व्यक्तींना अनेक कामांत यश मिळेल. या काळात तुम्हाला आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. वैवाहिक आयुष्य सुखमय राहील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.
वृषभ (Tauras Rashi Bhavishya)
केतुचे नक्षत्र परिवर्तन वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अनुकूल सिद्ध होईल. भाग्याची चांगली साथ मिळेल. या राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. समाजात मान-सन्मान मिळेल.
मकर (Capricorn Rashi Bhavishya)
केतूच्या नक्षत्र परिवर्तनाचा मकर राशीच्या व्यक्तींनादेखील सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)