Surya Ardra Nakshatra 2024: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्याचे प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन होते. तसेच वेळोवेळी सूर्याचे नक्षत्र परिवर्तनदेखील होते. कुंडलीत सूर्य शुभ असेल, तर व्यक्तीला आयुष्यात आत्मविश्वास, यश, मान-सन्मान, पैसा, पद यांसारख्या बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे आणि तूळ सूर्याची नीच राशी आहे. येत्या १५ जून रोजी सूर्य आर्द्रा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. आर्द्रा नक्षत्रावर राहू ग्रहाचे आधिपत्य असते, त्यामुळे सूर्याच्या या नक्षत्र परिवर्तनाने काही राशींच्या लोकांना त्याचा चांगला फायदा होईल.

मिथुन

सूर्याचे नक्षत्र परिवर्तन मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ परिणाम देणारे ठरेल. या काळात आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. वाणीवर नियंत्रण राहील, ज्यामुळे लोक तुमच्यावर इंप्रेस असतील. करिअरमध्ये हवे तसे यश मिळेल. आरोग्य समस्या दूर होतील. मेहनीचे पूर्ण फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी देखील सूर्याचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात समस्यांपासून सुटका होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. सिंह राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण कराल. उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. समाजात तुमची लोकप्रियता वाढेल.

हेही वाचा: १५ जूनपासून सूर्याचा जबरदस्त प्रभाव! ‘या’ पाच राशींच्या व्यक्तींना मिळणार मानसन्मान अन् पैसाच पैसा

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी देखील सूर्याचे नक्षत्रपरिवर्तन सकारात्मक परिणाम देणारे ठरेल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवन सुखमय असेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. कुटुंबातून आनंदी वार्ता येतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळवाल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)