मेष:-

तुमचा व्यवहार शालीन राहील. गोष्टी मनाप्रमाणे घडवून आणाल. न आवडणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. जोडीदाराला खुश कराल. आज तुमचा चांगला प्रभाव पडेल.

Shani Gochar 2025 horoscope saturn transit in meen
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये ‘या’ राशी होणार मालामाल; शनिदेवाच्या कृपेने मिळेल अमाप पैसा, पद अन् प्रतिष्ठा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Diwali 2024 horoscope three zodiac signs
दिवाळी घेऊन येणार सुखाचे दिवस; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना नोव्हेंबर महिन्यात मिळणार भरपूर पैसा, प्रेम अन् मानसन्मान
Grah Gochar 2024 : maa Lakshmi will give immense money
लक्ष्मीपूजनापूर्वी ५ मोठे ग्रह करणार गोचर, लक्ष्मी देणार ‘या’ पाच राशींना दिवाळी गिफ्ट, मिळणार अपार पैसा
Saturn transit 2024 in Aquarius
येणारे १५३ दिवस शनीच्या कृपेने दारी नांदणार लक्ष्मी; ‘या’ चार राशींचे व्यक्ती कमावणार बक्कळ पैसा
Dhantrayodashi 2024 Shubh Muhurat to buy Gold| Dhanteras 2024 Gold Buying Time
Dhantrayodashi 2024 Shubh Muhurat : धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी कोणत्या शुभ मुहूर्तावर खरेदी करावे? जाणून घ्या योग्य वेळ
Sun God has entered the sign of Venus
सूर्य देवाने शुक्रच्या राशीमध्ये केला प्रवेश! ‘या’ ३ राशींच्या लोकांना मिळणार अपार धन और पद-प्रतिष्ठा
Budh Gochar 2024
५ वर्षांनंतर धनत्रयोदशीला निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! ‘सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार

वृषभ:-

अचानक खर्च समोर येऊ शकतात. मानसिक व्यग्रता टाळावी. आपल्या मतावर ठाम राहावे. आज उधारी घेणे टाळावे. आध्यात्मिक बाबतीत प्रगती कराल.

मिथुन:-

आज चांगला धनलाभ होईल. गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील. केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. भावंडांसोबतच्या नात्यात सुधारणा होईल. जवळचे मित्र भेटतील.

कर्क:-

कामाच्या ठिकाणी प्रगती कराल. कामाचा उरक वाढवावा. सहकार्‍याला मदत कराल. घरातील कामासाठी वेळ काढावा लागेल. मन प्रसन्न राहील.

सिंह:-

बिघडलेल्या गोष्टी संतुलित करता येतील. आज मनात करुणा निर्माण होईल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल.

कन्या:-

आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नका. हलका आहार घ्यावा. व्यायामाला कंटाळू नका. काही अनपेक्षित गोष्टी घडून येतील.

तूळ:-

जोडीदारासमवेत वेळ मजेत घालवाल. लहान व्यवसायिकांना चांगला नफा कमावता येईल. तुमच्या ओळखीत वाढ होईल. सर्वांशी आपुलकीने वागाल. कौटुंबिक जीवनात समाधान मिळेल.

वृश्चिक:-

छुपे शत्रू माघार घेतील. कोणाकडूनही फार अपेक्षा ठेऊ नका. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. आपल्या कामात स्वत:ला गुंतवून घ्याल. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका.

धनू:-

कौटुंबिक जीवनात सुखद अनुभव येतील. आजचा दिवस खेळीमेळीने घालवाल. मुलांसोबत वेळ मजेत जाईल. रेस, सट्टा यातून लाभ संभवतो. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

मकर:-

आज अधिक वेळ घरात काढाल. स्वत:ला कामात गुंतवून घ्याल. मनातील निराशा दूर सारावी. वाहन विषयक कामे पार पडतील. मनातील विचार घरातील लोकांसमोर मांडाल.

कुंभ:-

आज घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. प्रवासात काळजी घ्यावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. लहान भावंडे आपल्याला मदत करतील. चौकसपणे सर्व गोष्टींकडे पहावे.

मीन:-

कुटुंबातील व्यक्तींबाबत अतिशय दक्ष राहाल. सर्वांची आपुलकीने काळजी घ्याल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. खाण्यापिण्याची हौस भागवाल. मनातील भावना व्यक्त कराल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर