Today Rashi Bhavishya, 15 October 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या राशीसाठी ठरेल लाभदायक? बाप्पा करणार का तुमच्या इच्छा पूर्ण; वाचा सोमवारचे राशिभविष्य
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
17th November rashi bhavishya panchang in Marathi | today Horoscope shiv yog rohini nakshatra
१७ नोव्हेंबर पंचांग : रोहिणी नक्षत्रात शिव योगामध्ये मेष ते मीनपैकी कोणाला होईल धनप्राप्ती; तुमचं नशिब फळफळणार का? वाचा राशिभविष्य
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश
१९ नोव्हेंबरला होऊ शकतो या राशींचा भाग्योदय! ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, प्रत्येक कामात मिळणार यश
Malavya Rajyog
शुक्र निर्माण करणार मालव्य राजयोग! २०२५ मध्ये ‘या’ राशींचे नशीब पलटणार, करिअरमध्ये यशासह मिळणार अपार धन
shukra gochar 2024 venus transit makar
२ डिसेंबरपासून ‘या’ राशींवर होईल शुक्राची कृपादृष्टी; मिळणार बक्कळ पैसा, नोकरी-व्यवसायात प्रगती अन् संधी
Daily Horoscope 12th November 2024 in Marathi
१२ नोव्हेंबर पंचांग: देवउठनी एकादशीला १२ पैकी ‘या’ राशींच्या जीवनात होतील मोठे बदल; कोणाला पावणार भगवान विष्णू देव? वाचा तुमचे राशिभविष्य

घरात शुभ कार्य ठरेल. वाहन विषयक काम निघेल. एखादी चांगली वार्ता मिळेल. मित्रांचे उत्तम सहकार्य लाभेल. नात्यांमधील विश्वास वाढीस लागेल.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

लहान प्रवास घडेल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. कर्तृत्वात वाढ होईल. मानसिक स्वास्थ्य जपावे. मनातील इच्छेबाबत आग्रही राहाल.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

विषयास अनुसरून बोलावे. अचानक धनलाभ संभवतो. घरातील गोष्टींबाबत दक्ष राहावे. कठीण कामे सुलभतेने पार पाडाल. अपचनाचा त्रास संभवतो.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

दिवसाची सुरुवात आनंददायी होईल. दिनक्रमात बदल कराल. अति उत्साहाने कामे करू नका. भागीदारीत आंधळा विश्वास ठेऊ नका. घाईने काम बिघडू शकते.

सिंह (Leo Horoscope Today ):-

मनाला न पटणार्‍या गोष्टीला होकार देऊ नका. कौटुंबिक गोष्टींसाठी खर्च कराल. तुमच्या मताला विरोध होऊ शकतो. निष्काळजीपणे वागू नका. भावनात्मक निर्णय टाळावा.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा. धावपळीचे योग्य वेळी लाभ मिळतील. कामातून आनंद शोधाल. सर्वांशी प्रेमाने वागाल. प्रिय व्यक्तीची गाठ पडेल.

तूळ (Libra Horoscope Today ):-

अघळपघळ बोलू नका. स्वच्छ व स्पष्ट मत मांडा. हातातील सर्व कामे सुरळीत पार पडतील. एखादा नवीन अनुभव गाठीशी बांधाल. जन संपर्कातून लाभ होईल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

फसवणुकीपासून सावध रहा. झोपेची तक्रार जाणवेल. तुमचे मत विचारात घेतले जाईल. रूचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. जास्त जबाबदारी अंगावर घेऊ नका.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

समोरच्याचा मान ठेवून वागा. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. दिग्गज मंडळींच्या भेटीचे योग येतील. काळ आणि वेळ लक्षात घ्या.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

चांगल्या कामासाठी पैसा खर्च केला जाईल. वैवाहिक सौख्यात वाढ होईल. कामे पूर्णत्वास नेण्यास प्रयत्नशील रहा. घरातील गोष्टी चिघळू देऊ नका. डोकेदुखीचा त्रास संभवतो.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

उत्तम लाभामुळे दिवस आनंदात जाईल. विनाकारण तर्क-वितर्क करू नका. वडीलांची साथ मोलाची ठरेल. योग्य नियोजनाने काम पूर्णत्वास जाईल. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या भेटीचा योग.

मीन (Pisces Horoscope Today ):-

बोलताना शब्दांचे थोडे भान ठेवा. एखाद्या महत्वाकांक्षी योजनेस प्रारंभ कराल. मेहनत व परिश्रम यांची कास सोडू नका. अचानक आलेल्या अडचणी संयमाने सोडवा. खर्चात वाढ होण्याची शक्यता.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर