मेष:-

अतिउत्साह दाखवू नका. सहजासहजी समोरच्यावर विश्वास ठेऊ नका. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. खाण्यापिण्याची आवड पूर्ण होईल. नातेवाईकांशी नाते अधिक दृढ होईल.

Guru Pushya Yog 2024
वर्षातील शेवटच्या गुरू पुष्य योगाने सोन्यासारखे चमकणार ‘या’ राशींचे नशीब, होणार अचानक धनलाभ
Gajalakshmi Raja Yoga
१२ वर्षांनंतर मिथुन राशीमध्ये निर्माण होईल गजलक्ष्मी राजयोग!…
sun transit in dhanu rashi 2024
३६५ दिवसांनंतर सूर्याचा जबरदस्त प्रभाव; धनु राशीतील प्रवेशाने ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस
mangal vakri january 2025 | mangal gochar 2025
Mangal Vakri 2025 : जानेवारी महिन्यात ‘या’ राशींचे नशीब फळफळणार; मंगळ ग्रहाच्या उलट्या चालीने मिळणार अमाप संपत्ती अन् सुख
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशीसाठी ठरेल वरदान? दत्तगुरु-देवी लक्ष्मी तुमची इच्छा पूर्ण करणार का? वाचा राशिभविष्य
budh
ग्रहांचा राजकुमार बुधची चाल होणार प्रतिगामी! वृश्चिक राशीसह ‘या’ राशीच्या लोकांची होणार चांदी
During Chaitra Navratri 2025 Shani will change the sign
चैत्र नवरात्रीच्या काळात शनी करणार राशी परिवर्तन; ‘या’ तीन राशींना मिळणार संपत्तीचे सुख
Shash Rajyog
Shash Rajyog : शनिदेवाने कुंभ राशीमध्ये बनवला शश राजयोग, ‘या’ तीन राशींचे फळफळणार नशीब , मिळणार अपार धन अन् पैसा
Daily Horoscope, 20 November
२० नोव्हेंबर पंचांग: बुधवारी वृषभ, मिथुनसह ‘या’ राशींना होणार दुप्पट लाभ; तुम्हाला चांगले बदल अनुभवायला मिळणार का? वाचा राशिभविष्य

वृषभ:-

वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. कोणत्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका. नवीन योजनेवर काम करण्यावर भर द्या. घरातील वातावरण आनंदी राहील. मित्रांचे सहकार्य लाभेल.

मिथुन:-

आपल्या आक्रमकतेला आळा घाला. योग्य नियोजनावर भर द्या. वैचारिक गुंतागुंत वाढवू नका. जोडीदाराचे प्रगल्भ विचार दिसून येतील. शिस्तीचे धोरण ठेवा.

कर्क:-

लोकांच्या चर्चेचा विषय बनाल. मित्रांकडून उधारी वसूल होईल. हातातील काम मन लावून करा. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा कराल. एकाच गोष्टीवर अडून राहू नका.

सिंह:-

कामानिमित्त लहान प्रवास घडतील. दिनक्रम व्यस्त राहील. कार्यालयीन कामे सुरळीत पार पडतील. सूर्योपासना उपयुक्त ठरेल. घरगुती वातावरण शांत राहील.

कन्या:-

जोडीदाराशी सामंजस्य ठेवा. वादाचे प्रसंग टाळावेत. आत्मविश्वासाने कार्यरत रहा. प्रयत्नात कसूर करू नका. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल.

तूळ:-

दिवस दगदगीत जाईल. नवीन कामात तडजोड करू नका. अचानक धनलाभ संभवतो. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका. संयमित व्यवहार करू नका.

वृश्चिक:-

शांत डोक्याने काम करावे. वरिष्ठांच्या मर्जीनेच काम करा. लाभाची संधी सोडू नका. केवळ कामावर लक्ष केंद्रित करावे. नवीन गोष्टी आत्मसात कराव्यात.

धनू:-

विद्यार्थ्यानी संधी सोडू नये. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. एक छोटासा बदल लाभदायक ठरेल. नवीन संधी उपलब्ध होतील. कुटुंबातील व्यक्तींशी वैचारिक मतभेद होऊ शकतात.

मकर:-

कामाच्या बाबतीत संभ्रमित राहू नका. प्रत्येक गोष्टीत स्पष्टता बाळगावी. निर्णय घेताना हवे तर वेळ मागून घ्या. जुगारातून लाभ संभवतो. एकावेळी अनेक गोष्टी हाताळू नका.

कुंभ:-

काही अनुत्तरित प्रश्न मार्गी लागतील. लोक तुमच्या मताचा विचार करतील. मोसमी आजरांकडे दुर्लक्ष करू नका. आहारवर नियंत्रण ठेवावे. व्यापारी वर्गाला दिवस चांगला जाईल.

मीन:-

व्यावसायिक गोष्टी नीट लक्षात घेऊन मगच मत नोंदवा. बोलताना सारासार विचार करावा. जोखीम पत्करावी लागेल. बुद्धीचा सुयोग्य वापर करावा. अडचणीत असलेल्यांना मदत कराल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर