मेष:-
हाती घेतलेल्या कामाला गती येईल. नवीन लोकांच्या संपर्कात याल. जोडीदाराबाबत समाधानी असाल. सामुदायिक बाबींचा फार विचार करू नका. आवडीचे पदार्थ चाखाल.
वृषभ:-
नोकरी संदर्भातील प्रस्ताव लक्षात घ्या. कौटुंबिक गोडी वाढवाल. मित्रांशी वादाचे प्रसंग येऊ शकतात. मुलांचे वागणे मनाविरुद्ध वाटू शकते. जमिनीच्या कामात अधिक वेळ जाईल.
मिथुन:-
दुर्लक्षितपणे वागून चालणार नाही. कामाच्या बाबतची स्थिती आवाक्यात येईल. आपल्या मतावर ठाम राहाल. सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न कराल. रेस, जुगार यातून लाभ संभवतो.
कर्क:-
कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. जोडीदाराचे मत विचारात घ्यावे. कामातील त्रुटी भरून काढाव्यात. अतिहट्ट बरा नाही. वैचारिक स्थिरता जपावी.
सिंह:-
नोकरदार व्यक्तींना थोडा दिलासा मिळेल. जवळचा प्रवास कराल. भावंडांशी संबंध सुधारतील. आवडता छंद जोपासाल. कामात वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
कन्या:-
आध्यात्मिक गोष्टींकडे मन वळवा. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील. सरकारी कामांना गती येईल. विशाल दृष्टीकोन बाळगाल. जोडीदाराशी खटके उडू शकतात.
तूळ:-
दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. आवडत्या गोष्टी करण्याकडे अधिक कल राहील. तुमच्यातील खेळकरपणा वाढेल. घरगुती गोष्टींमध्ये अधिक लक्ष घाला. इतरांना आपल्याकडे आकर्षित कराल.
वृश्चिक:-
मानसिक चंचलता जाणवेल. अति विचार करण्यात वेळ वाया जाईल. भागीदारीत गुंतवणूक कराल. योग्य ठोकताळ्याचा वापर करावा. क्रोधावर नियंत्रण ठेवा.
धनू:-
संघर्षमय स्थिती टाळावी. मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळचे मित्र भेटतील. पारंपरिक कामातून यश मिळेल. व्यावसायिक अडचणींकडे अधिक लक्ष द्या.
मकर:-
कामाचा वेग वाढेल. तुमची चिकाटी सर्वांच्या नजरेत येईल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. सामाजिक क्षेत्रातील लोकांना प्रतिष्ठा लाभेल. तब्येतीची काळजी घ्यावी.
कुंभ:-
समजूतदारपणे विचार करावा. बोलतांना सारासार गोष्टी लक्षात घ्याव्यात. आवश्यकता असेल तरच खर्च करावा. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. घरासाठी नवीन खरेदी कराल.
मीन:-
निर्णयावर ठाम राहावे. संपूर्ण विचारांती काम हाती घ्यावे. कामाचे चढउतार लक्षात घ्या. नसत्या गोष्टींच्या मागे लागू नका. गप्पा गोष्टींची आवड पूर्ण होईल.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर