Dainik Horoscope Live Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते. चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.
Today's Horoscope Live April 27, 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह २७ एप्रिल २०२५
आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)
उतावीळपणे कामे करणे टाळावे. खर्च करताना मागचा पुढचा विचार करावा. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. शांत व संयमी विचार करावा.
धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope in Marathi)
भावंडांशी मतभेद संभवतात. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे. व्यापारी वर्ग खुश राहील. स्वभावातील हट्टीपणा कमी करावा. वादविवादात भाग घेऊ नका.
वृश्चिक आजचे राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope in Marathi)
कौटुंबिक प्रश्नांकडे लक्ष द्यावे. कटुता टाळण्याचा प्रयत्न करावा. दिवसभर कार्यरत राहाल. मानसिक चंचलता जाणवेल. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी.
तूळ आजचे राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)
आपलेच म्हणणे खरे कराल. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. जोडीदाराचे तुमच्यावर प्रभुत्व राहील. सहकुटुंब सहलीचा बेत आखाल. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते.
कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. घरगुती वापराच्या वस्तु खरेदी केल्या जातील. मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक कामात रमून जाल. किरकोळ दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.
वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)
आध्यात्मिक बळ वाढेल. केलेल्या कामाचे कौतुक केले जाईल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. कामातून मनाजोगा आनंद मिळेल. वैचारिक दृष्टीकोन बदलला जाईल.
Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेला १०० वर्षांनंतर दुर्मीळ राजयोग; या राशींना मिळणार धनलाभ, करिअरमध्ये यश अन् व्यवसायात दुप्पट नफा
मेष आजचे राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)
मेष राशीच्या व्यक्ती गप्पांमध्ये रंगून जातील. व्यावसायिक अधिकार प्राप्त होतील. आर्थिक परिस्थिती सुधारली जाईल. काही गोष्टींचा धूर्तपणे विचार करावा. चौकसपणे गोष्टी जाणून घ्याल.
२८ एप्रिलपासून 'या राशींचे नशीब पालटणार! शनि-शुक्राच्या युतीने मिळू शकेल नोकरीत मोठी पगारवाढ अन् प्रमोशन
Saptahik Ank Jyotish : या ७ मूलांकाच्या लोकांचे भाग्य उजळणार, मेहनतीचे फळ मिळेल, अंकशास्त्रानुसार, कसा जाईल हा आठवडा
२८ एप्रिल ते ४ मे २०२५ या आठवड्यात काही लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो आणि कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवता येईल. तुमच्या आयुष्यात आनंद तुमच्या दारावर ठोठावू शकतो. मूलांक १ ते मूलांक ९ पर्यंतच्या लोकांचे आठवड्याचे राशीभविष्य जाणून घेऊया. सविस्तर वाचा
Weekly Horoscope 28 April To 4 May 2025 : या आठवड्यात या राशींना मिळेल नवीन नोकरीसह पदोन्नती, आर्थिक लाभाची शक्यता, जाणून घ्या आठवड्याचे राशीभविष्य
मेष, वृषभ, कर्क, सिंह, मिथुन, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या…सविस्तर वाचा
२८ एप्रिलपासून ‘या राशींचे नशीब पालटणार! शनि-शुक्राच्या युतीने मिळू शकेल नोकरीत मोठी पगारवाढ अन् प्रमोशन
Shani Shukra Yuti 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह विशिष्ट कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र बदल करतो. ज्याचा परिणाम १२ राशींवर दिसून येतो. त्याचप्रमाणे नऊ ग्रहांपैकी कर्मफळ दाता शनि आणि राक्षसांचा गुरु शुक्र हे दोन ग्रह राशी बदलासह आता नक्षत्र बदल करत आहेत. हे दोन्ही ग्रह सध्या मीन राशीत आहेत. सविस्तर वाचा
Daily Horoscope: अमावस्येला ‘या’ रूपात सूर्यदेव करणार तुमची इच्छापूर्ती; कोणाची आर्थिक परिस्थिती सुधारणार तर कोणाला नवीन अधिकार प्राप्त होणार
Rashi Bhavishya in Marathi, 27 April 2025 : २७ एप्रिल २०२५ रोजी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील अमावस्या आहे. अमावस्या रविवारी रात्री १ वाजून १ मिनिटांपर्यंत राहील. अश्विनी नक्षत्र रात्री १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत जागृत असेल. रात्री १२ वाजून १९ मिनिटांपर्यंत प्रीति योग जुळून येईल. राहू काळ ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असणार आहे. सविस्तर वाचा
Shukra Gochar 2025 : ३१ मेपासून ‘या’ राशींचे लोक होतील अफाट श्रीमंत! शुक्राच्या मेष राशीतील प्रवेशाने मिळेल प्रचंड सुख, पैसा अन् आनंद
मे महिन्याच्या शेवटी म्हणजे ३१ मे रोजी तो मेष राशीत प्रवेश करील, ज्यामुळे त्याचा परिणाम १२ राशींच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारे दिसून येईल. या भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊ…. सविस्तर वाचा
Shubu Vivah Muhurat In May : मे महिन्यात लग्न करायचा विचार करताय? एकूण १५ शुभ मुहूर्त, जाणून घ्या सर्व तारखा एका क्लिकवर
तुम्ही सुद्धा मे महिन्यात लग्न करण्याचा विचार करत असाल तर मे महिन्यात कोणत्या तारखा विवाहासाठी शुभ आहे, तुम्हाला माहितीये का? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. सविस्तर वाचा
अंकशास्त्र राशीभविष्य (सौजन्य - फ्रिपीक)
ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो.