मेष:-

वयाने लहान असणार्‍या लोकांशी मैत्री कराल. गप्पिष्ट लोकांच्यात वावराल. कामाचे योग्य नियोजन कराल. जोडीदाराच्या साथीत रमून जाल. इतरांना सहृदयतेने मदत कराल.

Mangal Margi 2025
२०२५ मध्ये नुसता पैसा; मंगळ होणार मार्गी ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् मानसन्मान
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rahu Gochar in Kumbh Rashi
२०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; राहूच्या राशी परिवर्तनाने येणार गडगंज श्रीमंती
Shani Sade Sati 2025
३० वर्षानंतर मेष राशीवर सुरू होणार शनिची साडेसाती, जाणून घ्या, कसे जाणार २०२५ वर्ष?
After 12 years the alliance of Jupiter and Moon will brighten the fortunes of 4 zodiac signs dreams will be fulfilled in 2025
१२ वर्षांनंतर गुरू आणि चंद्रच्या युतीने ४ राशींचे भाग्य उजळणार, २०२५मध्ये स्वप्न होतील पूर्ण, घर-वाहन खरेदीचा निर्माण होईल योग
Mars Gochar 2024
पुढील ९७ दिवस मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या दारी नांदणार लक्ष्मी
Surya Grahan 2025 And Shani Gochar
१०० वर्षांनंतर निर्माण होणार शनी गोचर आणि सुर्य ग्रहाचा संयोग! ‘या’ राशीच्या लोकांचा सुरु होईल सुवर्णकाळ, करिअर आणि व्यवसायात मिळेल यश
19 December 2024 Rashi Bhavishya
१९ डिसेंबर पंचांग: मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींचे दार; तुमच्या इच्छा आज पूर्ण होणार का? वाचा राशिभविष्य

वृषभ:-

व्यावसायिक ज्ञान वाढवाल. लेखक, प्राध्यापक यांना प्रगती करता येईल. व्यवहारी हजरजबाबीपणा दाखवाल. हुशारीने स्वत:च फायदा काढून घ्याल. योग्य कल्पकता दाखवाल.

मिथुन:-

कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण राहील. तुमच्या वक्तृत्वावर लोक खुश होतील. धोरणीपणे वागणे ठेवाल. काही गोष्टींची शिस्त बाळगावी लागेल. प्रवासाची आवड पूर्ण कराल.

कर्क:-

भावंडांच्या वागण्याचा सखोल विचार कराल. मेंदूला जरासा ताण द्यावा लागेल. कफाचे त्रास संभवतात. अति विचारात वेळ वाया जाईल. योग्य अनुमान काढावे.

सिंह:-

पत्नीची व्यवहार कुशलता दिसून येईल. जोडीदाराच्या सुस्वभावीपणाचे कौतुक कराल. मानसिक स्थिरता जपावी. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. विरोधकांवर मात करता येईल.

कन्या:-

फसवेपणाचा आधार घेऊ नका.  इतरांच्या विश्वासास पात्र व्हावे. जुनी भांडणे उकरून काढली जातील. कोणाचाही सल्ला चटकन मान्य करू नका. अविचाराने त्रास वाढू शकतो.

तूळ:-

बौद्धिक क्षेत्रात काम करणार्‍यांना दिवस चांगला जाईल. खोट्या गोष्टींचा विरोध करावा. घरगुती शांतता जपावी. प्रवास त्रासदायक ठरू शकतो. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक:-

संभाषणात बाजी माराल. नवीन मित्र जोडले जातील. जवळचे नातेवाईक भेटतील. तुमच्यातील प्रेमळपणा दाखवून द्यावा. भावंडांचे वागणे विरोधी वाटू शकते.

धनू:-

तुमच्यातील अहंमन्यता वाढू देवू नका. मनाची चलबिचलता सांभाळावी. काही खर्च आटोक्यात ठेवावेत. वैचारिक चलाखी दाखवाल. नवीन गोष्टीत रुची दाखवाल.

मकर:-

स्थिर विचार करावेत. बोलतांना सावधगिरी बाळगावी. कलेसाठी वेळ काढाल. धार्मिक ठिकाणी मदत कराल. गैरसमजातून वाद वाढू देवू नका.

कुंभ:-

गोष्टींचे आकलन चटकन होईल. बुद्धि चातुर्याने वागाल. स्मरणशक्तीचा चांगला फायदा होईल. अभ्यासूपणे गोष्टी जाणून घ्याल. हसत-हसत संभाषण कराल.

मीन:-

उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. बढतीचा योग येईल. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. उधारीचे व्यवहार तूर्तास टाळावेत.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader