Today Rashi Bhavishya, 28 November 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष:-

उपद्रवी लोकांच्या मागे जाऊ नका. धोकादायक ठिकाणी प्रवास करू नका. आजचा दिवस चांगला जाईल. समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव राहील. आपले कौतुक केले जाईल.

Daily Horoscope for Aries To Pisces
२३ डिसेंबर पंचांग: कोणाला पैशांचा फायदा तर कोणी घ्यावा धाडसाचा निर्णय? कशी होईल तुमच्या आठवड्याची सुरुवात? वाचा राशिभविष्य
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
21st Decembe 2024 Mesh To Meen Horoscope In Marathi
२१ डिसेंबर पंचांग: आजपासून उत्तरायणारंभ! कोणत्या राशीच्या पदरी पडेल यश तर कोणाला ठेवावा लागेल संयम; वाचा तुमचे राशिभविष्य
Yearly Horoscope 2025 in Marathi
Rashifal 2025: मेष ते मीन राशींसाठी कसे असेल नवीन वर्ष २०२५! जाणून घ्या १२ राशींचे वार्षिक राशीभविष्य
budhaditya rajyog 2025 | surya budha gochar rashibhavishya marathi
Budhaditya Rajyog: जानेवारी २०२५ मध्ये बुधादित्य राजयोगाने ‘या’ राशी होणार कोट्याधीशांच्या मालक! लाभू शकते अपार धन
Margashirsha Purnima 2024 15 december horoscope marathi
१५ डिसेंबर पंचांग: मार्गशीर्ष पौर्णिमेला कोणत्या राशींना होईल अचानक धनलाभ, लक्ष्मीच्या आशीर्वादाने मिळेल नोकरी, व्यवसायात यश
shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला मिळेल प्रार्थनेचे फळ तर व्यवसायिकांचा असेल सोन्याचा दिवस, वाचा तुमचे राशिभविष्य

वृषभ:-

तिखट पदार्थांचे सेवन करू नका. व्यवसायात तडजोड करावी लागेल. थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील. सावधगिरी बाळगून व्यवहार करावा. जोडीदाराशी नाते अधिक दृढ होईल.

मिथुन:-

आपला विचार जवळच्या व्यक्तीसमोर मांडा. दिवस उत्साहात जाईल. बदलांना सकारात्मकतेने सामोरे जा. कोणाबद्दलही वाईट चिंतू नका. सारासार विचार करून घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील.

कर्क:-

नोकरी, व्यवसायात घाई टाळावी. संमिश्र घटनांचा दिवस. घरातील वातावरण आनंदी व उत्साही असेल. यश व प्रगती साध्य करता येऊ शकेल. जनसंपर्कात वाढ होईल.

सिंह:-

शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करता येईल. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव दिसून येईल. परोपकाराची भावना प्रबळ होईल. दिनक्रम व्यस्त राहील. आत्मविश्वासाने केलेली कामे यशकारक ठरतील.

कन्या:-

घरासाठी नवीन खरेदी कराल. स्पर्धेत यश मिळेल. आजचा दिवस शुभ असेल. कष्ट काही प्रमाणात कमी होऊ शकतात. मन प्रसन्न राहील.

तूळ:-

नातेवाईकांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. आत्मविश्वासाने मुलाखत द्या. कामाच्या ठिकाणी नवीन गोष्टी शिकायला मिळतील. सावधगिरी बाळगून व्यवहार करावा. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

वृश्चिक:-

मित्रांशी दुरावलेले संबंध सुधारतील. नवीन गुंतवणूक फायद्याची ठरेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. मुलांच्या कृतीने मान उंचावेल. प्रिय व्यक्तीची भेट होईल.

धनू:-

आजचा दिवस शुभ ठरेल. हातातील कामात यश येईल. सामाजिक क्षेत्रात कौतुक केले जाईल. कठोर मेहनतीने मनोकामना पूर्ण कराल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील.

मकर:-

कोर्ट-कचेरीच्या कामात अडकू नका. धार्मिक ग्रंथ वाचनात वेळ घालवाल. फार विचार करण्यात वेळ घालवू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. नको त्या प्रलोभनात अडकू नका.

कुंभ:-

महत्त्वाच्या निर्णयात गोंधळू नका. स्वत:च्या कामातील प्रगतीकडे लक्ष ठेवा. मिळकत वाढीस लावण्याचे मार्ग शोधाल. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा. मनातील इच्छा पूर्ण होईल.

मीन:-

हातातील काम सोडून भलत्याच्या मागे धावू नका. न पटणार्‍या गोष्टी करू नका. उगाचच चिडचिड करू नका. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. गुरुप्रती निष्ठा कायम ठेवावी.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

Story img Loader