18th October 2024 Horoscope and Panchang In Marathi : आज १८ ऑक्टोबर २०२४ रोजी शुक्रवार आहे. शुक्रवारी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. प्रतिपदा तिथी दुपारी १ वाजून १६ मिनिटांपर्यंत राहील. वज्र योग रात्री ९ वाजून ३४ मिनिटांपर्यंत जुळून येईल. तसेच अश्विनी नक्षत्र शुक्रवारी दुपारी १ वाजून २६ मिनिटांपर्यंत जागृत असेल. आज राहू काळ सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते दुपारी १२ वाजेपर्यंत असणार आहे. तर आजचा दिवस १२ राशींसाठी कसा असणार आहे हे आपण जाणून घेऊ या…

१८ ऑक्टोबर पंचांग व राशिभविष्य (Mesh To Meen Rashibhavishya in Marathi) :

मेष:- मोठा प्रवास करता येईल. अचानक घडामोडी घडतील. कामाचे व्यवस्थापन करण्यात दिवस निघून जाईल. दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल. नवीन काम सुरू करण्यापूर्वी सर्व बाबी तपासून घ्या.

Mangal Gochar 2024 Mars will enter Moons house after 18 months three lucky zodiac signs will get immense money and wealth
१८ महिन्यानंतर मंगळ करणार चंद्राच्या घरात प्रवेश, ‘या’ तीन राशींचे नशीब पालटणार, मिळणार अपार पैसा अन् धनसंपत्ती
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Loksatta chaturang bhay bhuti Fear of an event in life
‘भय’भूती: भय-भोवरा
sun transit in libra
३६५ दिवसांनंतर ग्रहांचा राजा सूर्य तूळ राशीत करणार प्रवेश! ‘या; राशीच्या लोकांना मिळणार पद-प्रतिष्ठा, प्रत्येक कामात यश
shani nakshatra gochar 2024
पुढचे १८१ दिवस शनी देणार भरपूर पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी
Shadashtak yoga will create Saturn-Sun
शनी-सूर्य निर्माण करणार षडाष्टक योग; ‘या’ दोन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार संकटांचं वादळ होणार आर्थिक नुकसान
Surya transit in libra
नवरात्रीनंतर पैसाच पैसा! सूर्याच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात येणार यश, मानसन्मान आणि भौतिक सुख
Success Story Dr Syed Sabahat Azim
Success Story : वडिलांच्या निधनामुळे सोडलं आयएएस पद; ३० खाटा टाकून सुरू केली आरोग्य सेवा; वाचा अझीम यांची यशोगाथा

वृषभ:- मनाची चंचलता जाणवेल. मुलांकडून आनंद मिळेल. जोडीदाराची प्रगती दिसून येईल. हितशत्रू पराभूत होतील. हाताखालील कामगारांचे चांगले सहकार्य मिळेल.

मिथुन:- कामात काही बदल घडून येतील. जोडीदाराच्या सल्ल्याची मदत घ्याल. धावपळ करावी लागेल. दिवस संमिश्रतेत जाईल. मित्रांशी झालेला संवाद मन प्रसन्न करून जाईल.

कर्क:- लहान प्रवास घडेल. घरगुती कामात व्यस्त राहाल. घरातील टापटिपीकडे अधिक लक्ष द्याल. नातेवाईकांच्या भेटीचे योग आहेत. व्यावसायिकांनी अधिक परिश्रम घ्यावेत.

सिंह:- अडकलेल्या कामांना जोर लावावा. नशीबाची साथ मिळेल. व्यापारी वर्गाला सहकार्‍याकडून मदत मिळेल. बोलण्यातील गोडवा कायम ठेवा. हस्तकलेसाठी वेगळा वेळ राखून ठेवा.

कन्या:- घरातील गोष्टी मनाप्रमाणे घडतील. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. कामाची विचारपूर्वक अंमल बजावणी कराल. हातात काही अधिकार येतील.

तूळ:- क्षुल्लक कारणांवरून चीडू नका. गोड बोलून कार्यभाग साधावा. तुमच्या व्यक्तिमत्वाची चांगली छाप पडेल. आनंदाची अनुभूती घ्याल. मिळकतीची नवीन स्त्रोत सापडतील.

वृश्चिक:- नियोजन बद्ध कामे करा. मुलांची स्वतंत्र मते जाणून घ्या. क्रोध वृत्तीला आवर घाला. कामकाज सुधारण्याकडे अधिक लक्ष द्या. कौटुंबिक खर्चात वाढ संभवते.

धनू:- नातेवाईकांना मदत कराल. घरगुती खर्च आटोक्यात ठेवा. स्वत:च्या हिंमतीवर कामे हाती घ्याल. तरुण लोकांशी मैत्री होईल. कामात स्त्रियांची मदत लाभेल.

मकर:- महत्त्वाचे निर्णय हाती लागू शकतात. दिनक्रम व्यस्त राहील. आर्थिक व्यवहारात दक्ष राहावे. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका.

कुंभ:- मनाविरुद्ध गोष्टी करू नका. संभ्रमीत अवस्थेत निर्णय घेऊ नका. वैवाहिक जीवन सुखमय असेल. जवळचा प्रवास चांगला होईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना मान मिळेल.

मीन:- विचार सतत बदलू नका. तडकाफडकी गोष्टी करू नका. कुटुंबासमवेत वेळ घालवा. डोकेदुखीचा त्रास संभवतो. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर