-जयंती अलुरकर

सरस्वतीची करून भक्ति
ज्ञानसागरी मारून डुबकी
घेऊन हाती किल्ली यशाची
होवो तुमची सदाच प्रगती
हीच शुभकामना करोनी…
आपण या लेखास सुरुवात करू या. माझ्या सर्व विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो, ह्या लेखाकडे एक guideline म्हणून बघावे बरं का.

मेष रास (Aries Zodiac)

या वर्षी खूप मन लावून काम केलेल्या अभ्यासामुळे तुम्हाला हवे असणारे गुण, आणि यश तुम्ही संपादित करू शकता. अभ्यास करताना चौफेर विचार करावा, त्याने तुमची बुद्धी अजून तल्लख होईल व आपली कोणती बाजू कमकुवत आहे ह्याचा अंदाज आल्याने त्यावर काम करून ती उणीवही भरून काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न कराल. यशाने हुरळून न जाता अजून ज्यास्त आपली प्रगती कशी होईल ह्याचा सतत विचार करायचा प्रयत्न करा. हे वर्ष शैक्षणिक प्रगती व त्यातून करिअर घडवण्यास चांगले आहे.

Malavya rajyog in meen
शुक्र देणार गडगंज श्रीमंती! मालव्य राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Surya transit in kumbh
पुढील २८ दिवसानंतर सूर्य करणार मालामाल; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पद, प्रतिष्ठा अन् पैसाच पैसा
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
meen Rashi Bhavishya 2025 in Marathi
Pisces Yearly Horoscope 2025: २०२५ मध्ये ‘या’ राशीच्या मेहनतीचे होईल चीज! अनेक समस्यांमधून होईल सुटका; सोनल चितळेंकडून १२ महिन्यांचे राशिभविष्य जाणून घ्या
shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
Makar Sankranti 2025
आता नुसता पैसा! मकर संक्रांतीच्यापूर्वी निर्माण होतोय पावरफुल राजयोग, ‘या’ तीन राशींना सूर्यदेव लाखो रुपयांचा धनलाभासह देऊ शकतात आयुष्यभराचे सुख
Surya enter in makar rashi
चार दिवसानंतर सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींना मिळणार नवी नोकरी आणि संपत्तीचे सुख

वृषभ रास (Taurus Zodiac)

या वर्षी कोणत्याही संधीची नुसती वाट बघत बसणे चुकीचे ठरेल. हातपाय मारावे लागणार आहेत. बाहेर कुठे अभ्यासासाठी जायचे असल्यास १० ठिकाणी अर्ज केल्यावर १-२ ठिकाणी काम होईल, त्यामुळे प्रयत्न वाढवा. Results यायची वाट पाहताना समोर उपलब्ध असणारे प्रगतीचे वेगवेगळे मार्गही पाहत रहा. “मला काय करायला जमेल” ह्याचा पूर्ण अंदाज घ्या. घाईत निर्णय तर नकोच पण करू-बघू-होईल हा स्वभाव टाळा. लक्ष्य ठरवून पालन करा.

मिथुन रास (Gemini Zodiac)

या नवीन वर्षात तुम्हाला खूप नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमच्या अपेक्षे पेक्षा भराभर घटना घडणार आहेत. त्यामुळे आनंद तर होईलच पण त्या आनंदाच्या भरात कोणत्याही गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. यशाचे व शैक्षणिक प्रगतीचे मार्ग खुले होणार आहेत.

कर्क रास (Cancer Zodiac)

हे वर्ष तुम्हाला थोडेसे परिश्रमाचे जाणार आहे. काही गोष्टींची वाट पहात असाल तर त्याला विलंब होणार आहे. काही ठिकाणी वारंवार चकरा मारून काम होणार आहे. त्यामुळे नवीन admission च्या वेळी थोडे सजग रहा. काहींना प्रवेशाच्या तिसऱ्या फेरीत तर काहींना मॅनेजमेंट कोटातून प्रवेश मिळवावा लागेल. आपल्या अभ्यासातील फोकस थोडा विचलित होऊ शकतो. कोण काय शिकणार यापेक्षा मला काय शिकायचंय, शिकले पाहिजे यावरभर द्या. करिअरचे निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका. अभ्यास वाढवा.

सिंह (Leo Zodiac)

यावर्षी अनेक शुभ बदल तुमच्या आयुष्याला कलाटणी देणार आहेत, त्यासाठी तैयार रहा. ज्या यशाची तुम्ही कल्पना ही केली नसेल असे यश तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर प्रयत्नशील व्हा. लक्ष्य ठेवून काम करा, अभ्यासाचे वेळापत्रक तैयार करा आणि सुरु करा अभ्यास. यश हमखास मिळेल. पाठदुखी पासून मात्र सावध रहा आणि त्यावर वेळेवर उपचार घ्या.

कन्या (Virgo Zodiac)

हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. जे हमखास येत आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. गणित, शास्त्र ह्या विषयात चांगले गुण मिळतील, सराव सोडू नका. भाषा विषयांमध्ये थोडे कमी पडताय, तिकडे दुर्लक्ष होतंय का ते बघा. सर्व निर्णय घरच्यांच्या मदतीने घ्या. मित्र-मैत्रीण काय करतायत ह्यापेक्षा स्वतःच्या कुवतीप्रमाणे निर्णय घ्या. पालकांनी मुलाच्या कलाचा विचार करूनच त्याप्रमाणे त्यांना निर्णयात मदत करावी.

तूळ (Libra Zodiac)

वडीलधाऱ्या व्यक्तींचा या मुलांवर खूप पगडा आहे- ते म्हणतील ते ही मुले करतात. अभ्यासात चांगले मार्गदर्शन मुलांना मिळेल पण आपला आदर्श वाटणाऱ्या व्यक्तीच्या यशाने मुलांना न्यूनगंड वाटू शकतो. वडीलधाऱ्या व्यक्तींनी मुलांशी संवाद वाढवावा- दडपणाखाली काहीही केले तर त्यात यश मिळणे कठीण होते. मुलांनी अभ्यासाचे tension न घेता तो करावा. यश ठीकठाक मिळाले तरी हिरमुसून जाऊ नका. पालकांच्या अपेक्षा मुलांना घुसमटत नाहीत ना इतके पाहावे.

वृश्चिक (Scorpio Zodiac)

ह्या विद्यार्थी वर्गाने अभ्यासावर खरोखरच लक्ष केंद्रित करायची वेळ आहे. ह्यावर्षी तुम्ही खूप अळंटलं कराल. वर्षभर टाईमपास केल्यामुळे परीक्षेच्या वेळी ताण वाढणार आहे. आजपासूनच अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन करा, अन्यथा शेवटी खूप पळापळ होईल. ज्यांना प्रदेशात शिकायला जायचे आहे त्यांनी बरोबरीने आपली कागदपत्रे परिपूर्ण करण्यासाठी काटेकोर रहावे. कायमच द्विधा मनस्थिती चांगली नाही. विचार करा, पक्के ठरवा, आणि मग कृती करा.

धनु (Sagittarius Zodiac)

यंदा वेगळेपण जाणवणार आहे. अभ्यासाबरोबर तुमची इतर कलागुणांमध्ये सुद्धा प्रगती आहे- त्यासाठी वेळ काढताना अभ्यासाकडे मात्र दुर्लक्ष नको. नवनवीन मित्र-मैत्रीण मिळतील. तुमच्यासाठी हे खूपच खास वर्ष आहे. शाळा-college मध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये विशेष चुणूक दाखवायला मिळेल. गुण पण चांगलेच मिळतील. दोन्हीकडे सरावाची गरज तेवढीच आहे, परिश्रम घ्यायची गरज आहे.

मकर (Capricorn Zodiac)

तुम्हाला नवनवीन करिअरच्या संधी दिसणार आहेत व योग्य तो मार्ग तुम्ही अगदी सहज निवडाल. तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टीत करिअर करणार असल्याने विशेष आनंदी असणार आहात. हे वर्ष त्यासाठी उमेदीचे आहे. “मी कुठे आहे, मला कुठे पोचायचे आहे, त्यासाठी मला किती परिश्रम घ्यायला लागणार आहेत, किती वेळ आहे”, हे सर्व प्रश्न स्वतःला विचारा. ह्यामुळे पुढची प्रगती तुमच्या दृष्टीक्षेपात येईल. खूपच छान प्रगतीचे वर्ष आहे.

कुंभ रास (Aquarius Zodiac)

हे वर्ष तुम्हाला सर्वच बाबतीत भरभराटीचे आहे. तुम्ही अभ्यासावर फोकस आहात पण अति आत्मविश्वासामुळे निर्णय चुकण्याची शक्यता आहे. त्याकरता थोडे सजग रहा. स्पर्धा इतरांशी करण्या पेक्षा स्वतःशी करावी, त्याने स्वतःचा ज्यास्त फायदा होईल. ज्यांना कलाक्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यांनी त्याप्रमाणे आपले शिक्षण सुरु करावे. शाळा-कॉलेजच्या परीक्षांव्यतिरिक्त इतर स्पर्ध परीक्षा देण्यास हे वर्ष उत्तम यशदायी आहे.

मीन रास (Pisces Zodiac)

ह्यावर्षी तुमच्या अभ्यासातील मोठा अडथळा आहे तुमचे आरोग्य. ते सांभाळणे अत्यंत गरजेचे आहे. अभ्यासाचा ताण घेऊ नका. ह्यावर्षी तुमचे काही ना काही दुखणे सुरूच राहणार आहे. विशेषतः डोकेदुखी व हिमोग्लोबीन कमी होणे, तरी ह्यांच्यावर वेळीच उपचार करा. गुण तुमच्या अपेक्षेपेक्षा थोडेफार वरखाली झाले तरी त्रागा करून घेऊ नका.

Story img Loader