Trigrahi Yoga: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशीपरिवर्तनामुळे अनेकदा एकाच राशीत काही ग्रहांची युती निर्माण होते. ग्रहांच्या युतीचे नेहमीच शुभ किंवा अशुभ परिणाम १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतात. जून महिन्यात मिथुन राशीत तीन ग्रहांनी राशीपरिवर्तन केले आहे. सध्या जून राशीत शुक्र, बुध आणि सूर्य विराजमान आहेत. या तिन्ही ग्रहांच्या युतीमुळे मिथुन राशीत त्रिग्रही योग निर्माण झाला आहे. या त्रिग्रही योगामुळे काही राशींच्या व्यक्तींना अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील.

ज्योतिषशास्त्रानुसार १२ जून रोजी शुक्र ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केला, तर १४ जून रोजी बुध ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केला. तसेच १५ जून रोजी सूर्य ग्रहाने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. सध्या हे तिन्ही ग्रह मिथुन राशीत विराजमान आहेत.

masik rashifal july 2024 very lucky for 5 zodiac signs
जुलै महिना या ५ राशींसाठी ठरेल वरदान! मिळेल सुवर्णसंधी आणि राजवैभव
Rahu In Shani Nakshatra Gochar 2024
शनीच्या नक्षत्रात सोन्याचे दिवस, ‘या’ ५ राशींचे अच्छे दिन जुलैच्या पहिल्याच आठवड्यात होणार सुरु; तुम्हाला कशी लाभेल श्रीमंती?
Budh Gochar 2024
३ दिवसांनी ‘या’ राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, हाती येणार अमाप पैसा? बुधदेवाच्या कृपेने होऊ शकतात गडगंज श्रीमंत
27th June 2024 Guruvar Rashi Bhavishya Krishna Paksha Shashti Tithi mesh to mean zodiac signs daily marathi horoscope in marathi
२७ जून पंचांग: नोकरी, व्यवसायात मिळेल लाभ, कामानिमित्त घडतील प्रवास; मेष ते मीन राशींचा असा जाईल गुरुवार
Shukra Nakshatra Parivartan
१८ जूनपासून ‘या’ ४ राशी होतील आनंदी? शुक्रदेवाच्या नक्षत्र परिवर्तनाने श्रीमंत होण्याची संधी चालत येऊ शकते तुमच्या दारी
Budh Vakri 2024
वाईट काळ संपणार! ४७ दिवसांनी ‘या’ राशींचा सुरु होतोय सुवर्णकाळ? बुधदेवाची वक्री चाल तुम्हाला देऊ शकते अपार श्रीमंती
Chaturgrahi Yog 2024
उद्यापासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? १०० वर्षांनी ४ ग्रहांची महायुती होताच लक्ष्मी येईल दारी!
Budh Uday 2024
६ दिवसांनी ‘या’ ५ राशी होणार श्रीमंत? बुधदेवाचे उदय होताच माता लक्ष्मीच्या कृपेने मिळू शकतो अपार पैसा

मेष

मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा त्रिग्रही योग खूप सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. या काळात आकस्मिक धनलाभ होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठीदेखील हा त्रिग्रही योग खूप अनुकूल असेल. मिथुन राशीच्या व्यक्तींना या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता.

हेही वाचा: ४ दिवसांनंतर घरी नांदणार लक्ष्मी; शनि वक्री होताच ‘या’ पाच राशीच्या व्यक्तींना मिळणार भरपूर पैसा

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप लाभदायक असेल. या काळात तूळ राशीच्या व्यक्तींना भौतिक सुख प्राप्त होईल, धार्मिक कार्यात यश मिळेल, आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. दूरचे प्रवास घडतील. या काळात वैवाहिक जीवन सुखमय राहील. स्पर्धा परीक्षेत हवे तसे यश मिळेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)