Venus transit: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन प्रत्येक राशीच्या व्यक्तींसाठी खूप खास मानले जाते. या जून महिन्यातदेखील बऱ्याच ग्रहांचे राशीपरिवर्तन झाले. भौतिक सुख, ऐश्वर्य, सौंदर्याचा कारक ग्रह असलेल्या शुक्र ग्रहाने १२ जून रोजी मिथुन राशीत प्रवेश केला होता. आता ७ जुलै रोजी शुक्र मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल. शुक्राच्या कर्क राशीतील प्रवेशाने काही राशींच्या व्यक्तींना त्याचा अधिक फायदा होईल.
मेष
शुक्राच्या कर्क राशीतील प्रवेशाने मेष राशीच्या व्यक्तींना अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. अडकलेली कामे पूर्णत्वास येतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.
वृषभ
शुक्राच्या कर्क राशीतील राशीपरिवर्तनाने वृषभ राशीच्या व्यक्तींना अनेक फायदे होतील. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी येईल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील.
मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींनादेखील शुक्राचे कर्क राशीतील राशीपरिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. तुम्ही आनंदी राहिल्यामुळे प्रत्येक कामात सहज यश प्राप्त कराल. कुटुंबातील वाद मिटतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. आर्थिक चणचण दूर होईल; तसेच वायफळ खर्च थांबतील. मुलांसोबत सहलीला जाल.
कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींना शुक्राच्या कर्क राशीतील राशीपरिवर्तनाचा अधिक फायदा होईल. या काळात तुमच्या आयुष्यात अनेक बदल होतील. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठीदेखील शुक्राचे कर्क राशीतील राशीपरिवर्तन अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मानसन्मानात वाढ होईल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)