Guru Nakshatra Gochar 2024: ज्योतिषशास्त्रात गुरू ग्रहाला देवतांचे गुरू मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार गुरू ग्रह ज्ञान, यश सुख-समृद्धीचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरू ग्रह उत्तम स्थितीत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, ज्ञान प्राप्त होते; तसेच अशा व्यक्तींची आर्थिक परिस्थितीदेखील चांगली असते. गुरू ग्रहाचे ठरावीक काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते; ज्याचा प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. गुरू ग्रहाने १३ जून रोजी सकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी रोजी रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश केला होता. या नक्षत्रात गुरू ग्रह जवळपास दोन महिने विराजमान असेल. त्यानंतर तो २० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी मृगशिरा नक्षत्रामध्ये प्रवेश करील. मृगशिरा नक्षत्राचा स्वामी ग्रह मंगळ असून, गुरूच्या या नक्षत्र परिवर्तनाने १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर त्याचा प्रभाव पाहायला मिळेल.

मेष

गुरूच्या नक्षत्र परिवर्तनाने मेष राशीच्या व्यक्तींना अनेक आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे.

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात गुरू ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

तूळ

गुरूच्या नक्षत्र परिवर्तनाने तूळ राशीच्या व्यक्तींची नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना गुरू नक्षत्र परिवर्तनाने या काळात कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल.

हेही वाचा: मंगळ-चंद्राची युती करणार कमाल; महालक्ष्मी योगामुळे ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा

कुंभ

गुरू ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने कुंभ राशीच्या व्यक्तींना या काळात उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम असेल. करिअरमध्ये यश मिळेल. भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहील.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)