Nakshatra Change Of Saturn: ज्योतिषशास्त्रात शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन नेहमीच खूप खास मानले जाते. त्याचा काही राशीधारकांवर सकारात्मक; तर काही राशींच्या व्यक्तींवर नकारात्मक परिणाम पाहायला मिळतो. सध्या शनी देव कुंभ राशीत विराजमान असून, पूर्व भाद्रपद नक्षत्राच्या द्वितीप स्थानात भ्रमण करीत आहेत. येत्या १८ ऑगस्ट रोजी शनी याच नक्षत्राच्या पहिल्या स्थानात संक्रमण करील. त्यानंतर ३ ऑक्टोबर शनी शततारका नक्षत्राच्या चौथ्या स्थानात प्रवेश करील. दरम्यान, शनीच्या पूर्व भाद्रपद नक्षत्रात पहिल्या स्थानातील प्रवेशाने काही राशींच्या व्यक्तींना ८७ दिवस अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील.
कन्या
कन्या राशीच्या व्यक्तींना शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने कायदेशीर प्रकरणात यश मिळेल. व्यवसायात यश मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. दूरचे प्रवास घडण्याची शक्यता आहे.
वृश्चिक
शनीच्या नक्षत्र परिवर्तनाने वृश्चिक राशीच्या व्यक्तींना ८७ दिवस अनुकूल परिणाम पाहायला मिळतील. अडकलेली कामे पूर्णत्वास येतील. आनंदी वार्ता कानी पडतील. या काळात अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील; तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठीदेखील शनीचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभकारी सिद्ध होईल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात काही अडचणी येतील; पण तुम्ही त्या दूर करण्यास सक्षम असाल.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)