दरवर्षी कोणते ना कोणते ग्रहण येत असते. ही ग्रहणे काही देशांमध्ये पाहता येऊ शकतात; तर काही देशांमध्ये ती दिसू शकत नाहीत. तसेच ज्योतिषशास्त्रात इतर अनेक बाबींप्रमाणेच ग्रहणांनासुद्धा फार महत्त्व दिले जाते. प्रत्येक ग्रहणाचे प्रत्येक राशीवर शुभ आणि अशुभ असे परिणाम होत असतात. ज्या राशींवर या ग्रहणाचा नकारात्मक प्रभाव पडतो, त्या राशींच्या व्यक्तींना बरेच नुकसान सहन करावे लागते; तर याविरुद्ध ज्यांच्या राशींवर याचा सकारात्मक प्रभाव पडतो, त्यांना भरभरून यश आणि सुखसमृद्धी प्राप्त होऊ शकते.

येणारे २०२४ हे नवीन वर्ष आपल्यासोबतात सुखसंपत्ती, आनंद, उत्साह, यश यांसारख्या बऱ्याच गोष्टी सोबत घेऊन येणार आहे. त्यासोबतच ग्रहणेदेखील घेऊन येणार आहे. या वर्षात चंद्रग्रहणे आणि सूर्यग्रहणे किती असतील आणि ती कधी असतील ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. सोबत ही सर्व ग्रहणे भारतातून पाहता येतील की नाही तेसुद्धा लक्षात घ्या.

Sexual assault
लैंगिक अत्याचार म्हणजे काय ?
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
umbilical cord wrap around the babys neck due to the sleeping position of the pregnant woman read whats doctors said
गर्भवती महिलेच्या झोपण्याच्या स्थितीमुळे बाळाच्या गळ्याभोवती गुंडाळली जाते नाळ? वाचा डॉक्टरांचे मत
Sangli, attack on girl, girl college,
सांगली : महाविद्यालयास जात असताना तरुणीवर हल्ला
Animal Video Viral
…म्हणून कुणालाच कमी समजू नका! बिबट्यानं हल्ला चढवताच इवल्याशा बदकाने लढवली अशी शक्कल की, VIDEO पाहून कौतुक कराल
Marathi Actress pratima deshpande pregnant share baby shower video
Video: ८ महिन्यांपूर्वी लग्न करणाऱ्या लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार, डोहाळे जेवणाचा व्हिडीओ झाला व्हायरल
video of a bull attacking two men on a bike
‘चल तुला पेट्रोल पंपापर्यंत…’ संतापलेल्या बैलाचा दुचाकीस्वारांवर हल्ला; बाईकला ढकलत नेलं अन्… VIDEO पाहून येईल अंगावर काटा
Supriya Sule on Ladki Bahin Yojana
Supriya Sule : “मी माझ्या बहिणींना विनंती करते…”, लाडक्या बहीण योजनेचे पैसे आल्यानंतर सुप्रिया सुळेंचं महिलांना आवाहन!

२०२४ मधील ग्रहणांची यादी पाहा

१. पहिले ग्रहण

नवीन वर्षातील सर्वांत पहिले चंद्रग्रहण असणार आहे. सोमवार, २५ मार्च २०२४ रोजी पौर्णिमेला नेहमी दिसते, तसेच हे ग्रहण दिसणार आहे.

२. दुसरे ग्रहण

पहिले ग्रहण झाल्यानंतर लगेचच १४ दिवसांनी दुसरे ग्रहण लागणार आहे. हे एक सूर्यग्रहण असणार आहे. ८ एप्रिल २०२४ रोजी सोमवारी हे सूर्यग्रहण लागणार आहे.

३. तिसरे ग्रहण

बुधवार, १८ सप्टेंबर २०२४, रोजी, आंशिक चंद्रग्रहण लागणार आहे. हे ग्रहण वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण असणार आहे.

हेही वाचा : १० डिसेंबरपासून ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरु? त्रिग्रही योग बनताच भरमसाठ संपत्ती मिळण्याची शक्यता

४. चौथे ग्रहण

वर्षातील शेवटचे ग्रहण हे २ ऑक्टोबर २०२४ रोजी लागणार असून, हे सूर्यग्रहण असणार आहे. योगायोग म्हणजे हे सूर्यग्रहणदेखील वर्षातील पहिल्या चंद्रग्रहणाप्रमाणे बरोबर १४ दिवसांनी येणार आहे.