Solar eclipse 2023: वैशाख महिन्यातील अमावास्येला म्हणजेच २० एप्रिलला होणारे सुर्यग्रहण हे २०२३ मधील पहिले सुर्यग्रहण असणार आहे. या सूर्यग्रहणाला वैज्ञानिकांनी संकरित किंवा हायब्रीड सूर्यग्रहण असे नाव दिले आहे. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये चंद्र येतो आणि तिघेही एका सरळ रेषेत असतात, त्यावेळी हे सूर्यग्रहण दिसतं यालाच ‘हायब्रीड सूर्यग्रहण’ असे म्हणतात. हे सूर्यग्रहण खास आहे, कारण आंशिक, संपूर्ण आणि कंकणाकृती अशा तीनही स्वरूपांत हे सूर्यग्रहण दिसणार आहे. सुमारे १०० वर्षांत एकदाच अशी खगोलीय घटना पाहायला मिळते.
हायब्रिड सूर्यग्रहण कधी सुरू होईल?
हायब्रीड सूर्यग्रहण २० एप्रिल रोजी सकाळी १०:०४ वाजता सुरू होईल आणि दुपारी ११.३० वाजता संपेल. ग्रहण दोन तासांपेक्षा जास्त काळ चालेल. जेव्हा सूर्य पूर्णपणे झाकलेला असेल तेव्हा संपूर्ण सुर्यग्रहण दिसेल जे एका मिनिटापेक्षा कमी काळ टिकेल.

हायब्रिड सूर्यग्रहणाचे साक्षीदार ठरतील ही शहरे
हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, पण उर्वरित जगामध्ये ते सहज पाहता येणार आहे. वेळ आणि तारखेनुसार गुरुवारी ऑस्ट्रेलियातील अनेक भागांमध्ये हायब्रीड ग्रहण दिसणार आहे
सूर्यग्रहणाचा मार्ग भारतातून जात नाही आणि दक्षिण/पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक, हिंद महासागर आणि अंटार्क्टिकाच्या काही भागात ते दृश्यमान असेल. संपूर्ण ग्रहण पश्चिम ऑस्ट्रेलियातील एक्समाउथमध्ये दिसेल.
हेही वाचा : १०० वर्षांत पहिल्यांदा दिसणार ‘हायब्रीड सूर्यग्रहण’, काय आहे वेगळं? तुमच्यावर काय होईल का परिणाम? जाणून घ्या
जगातील ही शहरे हायब्रिड सूर्यग्रहणाचे ठरतील साक्षीदार
- आम्सटरडॅम बेट – फ्रेंच दक्षिणी प्रदेश
- पोर्ट-औक्स-फ्राँकाइस – फ्रेंच दक्षिणी प्रदेश, फ्रान्स
- पर्थ – वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलिया
- जकार्ता – जकार्ता विशेष राजधानी क्षेत्र, इंडोनेशिया
- मकासर – दक्षिण सुलावेसी, इंडोनेशिया
- दिली – तिमोर-लेस्ते
- डार्विन – नॉर्दर्न टेरिटरी, ऑस्ट्रेलिया
- जनरल सँटोस – फिलीपिन्स
- मनोकवारी – पश्चिम पापुआ, इंडोनेशिया
- पोर्ट मोरेस्बी – पापुआ न्यू गिनी
- नगेरुल्मुड – पलाऊ
- होनियारा – सॉलोमन बेट
- होगोटना (Hagåtña) – ग्वाम
- सायपन, उत्तर मारियाना बेट
- बेकर बेट – यूएस मायनर आउटलाइंग बेट
- पालीकीर – पोहनपेई, मायक्रोनेशिया
- फुनाफुटी – तुवालू
- येरेन – नौरू
- तारावा – किरिबाती
- माजुरो – मार्शल बेट