Personality traits of ‘I’ Letter: व्यक्तीचे नाव हीच त्याची ओळख असते असे म्हणतात. पण त्याच्या नावाचे पहिले अक्षर त्याच्या व्यक्तिमत्त्वाबाबत बरेच काही सांगू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का? वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, लोकांच्या नावामध्ये पहिले अक्षर त्याचा स्वभाव, करिअर, लव्ह लाइफ इत्यादींबाबत खूप काही सांगू शकते. आज आम्ही तुम्हाला ‘I’ या अक्षर असलेल्या लोकांबाबत सांगणार आहोत.

‘I’ अक्षर असलेले लोक अत्यंत भावनिक असतात असे मानले जाते. हे लोक प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठेवतात आणि त्यांचे निर्णय भावनिक असतात असेही म्हटले जाते. पण ‘I’ अक्षर असलेले लोक अत्यंत साहसी असतात असे मानतात. असे म्हणतात की, हे लोक कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरत नाहीत आणि त्यांना प्रत्येक काम व्यवस्थित पद्धतीने करण्याची सवय असते. ‘I’ अक्षर असलेले लोक खूप मेहनत आणि धैर्याने आयुष्यात पुढे जातात आणि यश मिळवू शकतात, असे मानले जाते. असे म्हणतात की हे लोक समाजात एक नवे स्थान मिळवू शकतात.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
epileptic attack, youth epileptic attack, Pune,
पुणे : अपघातानंतर तरुणाला अपस्माराचा झटका, पोलीस उपायुक्त संदीप भाजीभाकरेंच्या तत्परतेमुळे वैद्यकीय मदत
Ajit Pawar visits accident site decides to provide Rs 5 lakh assistance to families of deceased
अपघातस्थळी अजित पवार यांची भेट, मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत देण्याचा निर्णय
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “मी शब्दांत शूर, पण सुरात असूर”, मुख्यमंत्र्यांच्या विधानाने हशा; म्हणाले, “लोकांचा गैरसमज होतो की…”
Premachi Goshta Fame Actress Amruta Bane
सासरे असावेत तर असे! ‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीची सासरेबुवांसाठी खास पोस्ट; अभिनेता पती कमेंट करत म्हणाला…

हेही वाचा Palmistry: तळहातावर ‘X’ अक्षर असणारे लोक आयुष्यात कमावू शकतात भरपूर पैसा?

‘I’ अक्षर असलेले लोक दिसायला फार सुंदर असतात. त्यामुळे ते लोकांना सहज स्वत:कडे आकर्षित करू शकतात असे मानले जाते. असे म्हणतात की या व्यक्ती जिथे जातात तिथे चर्चेचा विषय ठरतात, लोक सतत त्यांच्या सभोवताली राहण्याचा प्रयत्न करतात आणि हे लोक प्रत्येक पार्टीची शान असतात. ‘I’ अक्षर असलेल्या लोकांसाठी त्यांच्या जोडीदाराची इच्छा खूप महत्त्वाची असते असे म्हणतात. हे लोक प्रेमाला खूप महत्त्व देतात आणि प्रेमाने सर्वांचे मन जिंकतात असे मानले जाते.

करिअरबाबत सांगायचे झाले तर, ‘I’ अक्षर असलेले लोक फार मेहनती आणि बुद्धिवान असतात असे मानतात. असे म्हणतात की, हे लोक मेहनती असतात आणि पूर्ण प्रामाणिकपणे त्यांचे काम पूर्ण करतात. तसेच त्यांना आळशीपणा अजिबात आवडत नाही आणि प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्यावर विश्वास ठेवतात.

हेही वाचा – सात दिवसांनी बुध ग्रह करणार राशी परिवर्तन! ‘या’ तीन राशींच्या लोकांना होऊ शकतो अचानक धनलाभ?

असे म्हणतात की ‘I’ अक्षर असलेले लोक नेहमी काही तरी नवीन शिकण्यात मग्न असतात आणि ही त्यांची सर्वात मोठी खासियत आहे. ते कधीही शांत बसू शकत नाहीत. ‘I’ अक्षर असलेले लोक कला संपन्न असतात आणि कलेच्या माध्यमातून ते या क्षेत्रात उच्च स्थान प्राप्त करतात असे मानले जाते. असे म्हणतात की, हे लोक सर्व भौतिक सुखसोयींचे जीवन जगतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader