Gemology Gems stone: तुम्ही अनेक लोकांना रत्न परिधान करताना पाहिले असेल. बरेच लोक सल्ल्यानुसार रत्न धारण करतात, तर बरेच लोक सल्ला न घेता रत्न स्वीकारतात. रत्न परिधान करण्याबाबत अनेक तज्ञ म्हणतात की सल्ल्याशिवाय रत्न घालू नये. तज्ञांच्या मते, जर तुम्ही तुमच्या राशीनुसार रत्ने परिधान केलीत तर ते तुम्हाला श्रीमंत देखील बनवू शकतात.आज आम्ही तुमच्यासाठी काही रत्न घेऊन आलो आहोत जे तुम्ही घालू नयेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांनी विशेषतः कोरल आणि पुष्कराज ही रत्न घालू नयेत. वृषभ राशीच्या लोकांची ही रत्न तुमच्या यशात अडथळे निर्माण करतील. जर तुम्ही हे रत्न धारण केले तर तुमच्या आयुष्यात कधीही आनंद येऊ शकत नाही.

(हे ही वाचा: ‘या’ ४ राशींच्या लोकांचा विश्वास संपादन करणे असते कठीण!)

मेष (Aries)

मेष राशीच्या लोकांनी पन्ना आणि पुष्कराज घालू नये. ही रत्न या लोकांच्या आयुष्यात फक्त हानी पोहचवतात. एवढेच नाही तर त्यांचे कुटुंबीयही नाराज त्यांच्यावर राहतात.

सिंह (Leo)

सिंह राशीच्या लोकांनी शनिदेवाचा नीलम पाषाण कधीही धारण करू नये. कारण सूर्य सिंह राशीच्या लोकांचा स्वामी आहे. सूर्याचा स्वामी होण्यासाठी नीलम धारण करू नये.

(हे ही वाचा: स्वप्नात ‘या’ ५ गोष्टी दिसणे देतात धन प्राप्तीचे संकेत!)

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठीही असेचं आहे. कर्क राशीच्या लोकांनी शनीचा नीलम धारण करू नये. कर्क राशीच्या लोकांचा स्वामी चंद्र आहे. कर्क राशीच्या लोकांनी हे रत्न घालू नये.

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांनी हिरा आणि नीलम ही रत्न घालू नयेत. त्यांच्यासाठी हे अशुभ आहे.

(हे ही वाचा: ‘या’ ३ राशींची लोक एका भेटीत जिंकतात मन; असते आकर्षित करणारे व्यक्तिमत्व!)

कन्या (Virgo)

कन्या राशीच्या लोकांनी नीलम, माणिक आणि कोरल रत्ने घालू नयेत. कारण कन्या राशीचा स्वामी बुध आहे आणि बुध ग्रहासाठी हे रत्न धारण करणे योग्य नाही.

मकर (Capricornus)

मकर राशीच्या लोकांनी पुखराज हे रत्न धारण करू नये. मकर राशीच्या लोकांचा स्वामी शनि आहे.

(हे ही वाचा: ‘ही’ जन्मतारीख असणाऱ्या लोकांमध्ये पैसा कमावण्याची असते प्रचंड हौस, शुक्राच्या कृपेने होतात सर्व काम!)

कुंभ (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांचा स्वामी देखील शनि आहे, यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी पन्ना घालू नये.

वृश्चिक (Scorpius)

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांनी कोरल आणि हिऱ्याची रत्न घालू नयेत.

(हे ही वाचा: Numerology: ‘ही’ जन्मतारीख असलेल्या लोकांनावर असते धनाची देवता कुबेरांची विशेष कृपा)

तुळ (Libra)

तुळ राशीच्या लोकांनी पन्ना आणि पुष्कराज घालू नये.

धनु (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांसाठी मोती घालणे हानिकारक आहे.

मीन (Pisces)

मीन राशीच्या लोकांनी नीलम आणि माणिक परिधान करणे धोकादायक ठरू शकते.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)