Rahu Ketu Gochar 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, राहू व केतू यांना मायावी ग्रह म्हणून ओळखले जाते. राहू केतू हे नेहमीच वक्री असतात व त्यांच्या परिवर्तनाला दीड वर्ष म्हणजे साधारण १८ महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. येत्या ३० ऑक्टोबरला राहू व केतू १८ महिन्यांनी गोचर करणार आहेत. सध्या राहू मेष राशीत तर केतू तूळ राशीत आहे आणि ३० ऑक्टोबरला राहू मीन राशीत व केतू कन्या राशीत प्रवेश करणार आहे. राहू व केतू गोचराचा प्रभाव सर्वच राशींवर होणार असला तरी तीन राशी अशा आहेत ज्यांना सर्वाधिक फायदा होण्याची चिन्हे आहेत. केतू हा श्रीमंतीत न सुखावणारा ग्रह असला तरी राहूच्या प्रभावामुळे या राशींना अत्यंत महत्त्वाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. ३० ऑक्टोबर पासून कोणत्या राशींचे सोन्यासारखे अच्छे दिन सुरु होण्याचे योग आहेत हे पाहूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहु-केतु गोचरामुळे ‘या’ ३ राशींना जगता येणार सोन्यासारखे अच्छे दिन

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

राहू केतू गोचर मेष राशीच्या मंडळींसाठी अत्यंत लाभदायक व शुभ सिद्ध होऊ शकतो. राहू हा मेष राशीतून बाहेर पडत मीन राशीत प्रवेश करणार आहे. मेष राशीच्या मंडळींना या काळात आरोग्यरूपी धनसंपदा लाभणार आहे. जुन्या समस्यांमधून सुटका मिळू शकते. भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. मेष राशीला जेव्हा राहू बारावा असतो त्याच्या नेमक्या सहाव्या स्थानात केतू विराजमान झालेला असतो. केतू जेव्हा मेष राशीला येतो तेव्हा सामाजिक राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढते. नावलौकीक होतो नी अधिकारप्राप्त होतो हा अठरा महिन्याचा कालावधी खूप उत्कर्ष घडवून आणतो.

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

वृषभ ही शुक्राची राशी त्या राशीच्या लाभस्थानात राहूचे वास्तव्य खूपच शुभदायक ठरेल. सामाजिक क्षेत्रात, राजकारणात हा राहू यशदायक ठरेल. तर नवीन परिचय, नवीन ओळखीतून उद्योगधंद्यात नोकरीत नव्या योजना आखल्या जातील. एकूण नातेवाईक मित्रमंडळींचा सहवास आनंदी उत्साही ठरेल. पोटाची विशेष काळजी घ्यावी. विशेषत: विद्यार्थ्यांनी अभ्यासात विशेष लक्ष द्यावे. वेळेचे भान ठेवून आळस झटकून आपली महत्त्वाची कामे पूर्ण करण्याकडे लक्ष असावे.

हे ही वाचा<< १०० वर्षांनी ‘आदित्य मंगल’ योग बनल्याने ‘या’ राशी होतील कोट्याधीश? कोजागिरी पौर्णिमेपासून सुखाचं चांदणे अनुभवा

कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)

कर्क राशीच्या भाग्यस्थानात राहू प्रवेश करीत आहे. सध्या राहू सोबत नेपच्यूनची उपस्थिती असणार आहे. एकूण हा योग नवमस्थानात खूपच शुभदायक ठरणार आहे. राजकारणात, सामाजिक कार्यात आपल्या मुत्सद्दीपणाचे कौतुक होईल. दूरचे प्रवास होतील. जागा प्रॉपर्टी संबंधातील कामे मार्गी लागतील. जुनी येणी येतील. एकूण या काळात खूपशा गोष्टी छान मार्गी लागतील. गूढविद्येत उत्तम प्रगती साधता येईल. एकूण प्रसिद्धी योगात केतूची उत्तम मदत लाभेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In 96 hours rahu ketu gochar these three rashi to live golden days with getting huge money take care according to your zodiac svs