२०२२ चा ऑगस्ट महिना ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीच्या दृष्टीने खास आहे. या महिन्यात अनेक राशींच्या आर्थिक समस्या दूर होण्यासोबतच प्रगतीचा मार्गही खुला होईल. ऑगस्ट महिन्यात बुध आणि सूर्याचे होणारे संक्रमण काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकते. जाणून घ्या या दोन ग्रहांचा राशींवर काय परिणाम होईल.
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी चांगले नशिब येण्याची दाट शक्यता आहे. १७ ऑगस्टपासून तुम्हाला एकामागून एक संकटातून मुक्ती मिळेल. सिंह राशीचा शासक ग्रह सूर्य देव आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, १७ ऑगस्ट रोजी सूर्य स्वतःच्या राशीत प्रवेश करेल. सिंह राशीच्या लोकांना सूर्य स्वतःच्या राशीत आल्याने मोठा फायदा होईल. यासोबतच सिंह राशी असणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात भरभराटीचा योग येण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा: budh gochar 2022: ऑगस्टच्या सुरुवातीला बदलेल ‘या’ चार राशींचे भाग्य, बुधाच्या गोचरामुळे प्रत्येक काम पूर्ण होईल)
सूर्य राशीपरिवर्तन कोणत्या वेळी होईल
१७ ऑगस्ट रोजी सकाळी ०७:१४ वाजता सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल. सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचा राशी बदल खूप फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी मिळू शकते. तसंच व्यवसायात किंवा नोकरीच्या ठिकाणी वाढ होण्याची शक्यता आहे.
कन्या राशीत बुधाचे संक्रमण
कन्या राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना आनंद आणू शकतो. २१ ऑगस्ट रोजी दुपारी १.५५ वाजता बुधचे संक्रमण होईल. या ग्रहादरम्यान बुध कन्या राशीत प्रवेश करेल. कन्या राशीचा अधिपती ग्रह बुध आहे. बुध स्वतःच्या राशीत आल्याने या राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक एखाद्या कामात यश मिळेल. या काळात आरोग्यसंबंधीत असलेल्या समस्याही निघून जाण्याची शक्यता आहे.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)