Venus transit 2024: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. लवकरच डिसेंबर महिना सुरू होणार असून या महिन्यामध्ये भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्र दोन वेळा राशी परिवर्तन करणार आहे. डिसेंबरच्या सुरूवातीला म्हणजेच २ डिसेंबर रोजी शुक्र धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार असून त्यानंतर शुक्र २८ डिसेंबर रोजी मकर राशीतून कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्राच्या कुंभ राशीतील प्रवेशाने शुक्र ग्रहाची शनी ग्रहाबरोबर युती निर्माण होईल. ज्यामुळे काही राशींच्या व्यक्तींना त्याचे उत्तम परिणाम पाहायला मिळतील.

शुक्राचे राशी परिवर्तन या राशींना करणार मालमाल

मेष

budh uday 2024
आता नुसता पैसा; डिसेंबरपासून बुधाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या धनसंपत्तीत होणार वाढ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
shani rash parivartan 2025 shani guru transit change luck of these zodiac
Shani Rashi Parivartan 2025: नववर्षात शनि-गुरु बदलणार चाल, ‘या’ राशीच्या लोकांच्या नशिबाचे दार उघडणार, नोकरीसह मिळणार पैसाच पैसा
Guru Nakshatra Gochar 2024
२८ नोव्हेंबरला गुरु बदलणार आपली चाल! ‘या’ राशीच्या लोकांच्या आयुष्यात येणार आनंद, मिळेल अपार धन
shani gochar 2025 | horoscope | astrology
नववर्ष २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे फळफळणार नशीब; शनीच्या मीन राशीतील प्रवेशाने मिळणार बक्कळ पैसा अन् नोकरीत यश
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश

मेष राशींच्या व्यक्तींसाठी शुक्राचा कुंभ राशीतील प्रवेश सकारात्मक फळ देणारा सिद्ध होईल. या काळात मेष राशीच्या व्यक्तींच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. या काळात तुमच्या आयुष्यात आकस्मिक धनलाभ होईल. तुमचे वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. आई-वडीलांची पुरेपुर साथ मिळेल. मेहनतीचे फळ मिळेल. अविवाहितांची लग्ने जुळतील.

वृषभ

वृषभ राशीच्या व्यक्तींनाही शुक्राचे राशी परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. शुक्र ग्रहासह तुमच्यावर शनीचीही कृपा असेल. त्यामुळे भाग्याची पुरेपुर साथ तुम्हाला मिळेल. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल.

तूळ

शुक्राचा कुंभ राशीतील प्रवेश तूळ राशीच्या व्यक्तींसाठीही लाभदायी सिद्ध होईल.आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. अविवाहितांची लग्ने जुळतील. धार्मिक कार्यात तुमचे मन रमेल. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील.

हेही वाचा: ‘या’ पाच राशींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस; राहू-केतूच्या राशी परिवर्तनाने मिळणार सुख, समृद्धी आणि संपत्तीचे सुख

मकर

मकर राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचा कुंभ राशीतील प्रवेश अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल आणि प्रेमसंबंधही सुखमय होतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीही शुक्र ग्रहाचा कुंभ राशीतील राशी परिवर्तन शुभ फळ प्रदान करणारे ठरेल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. अडकलेली कामे पूर्णत्वास येतील. आरोग्य तक्रारी बंद होतील.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)