Zodiac Signs: शनिदेव १२ जुलै रोजी आपली राशी बदलणार आहेत. शनी सध्या कुंभ राशीत बसला आहे. कुंभ राशीत राहात असताना ५ जून रोजी शनीची पूर्वगामी झाली होती. शनि कुंभ राशीतून प्रतिगामी अवस्थेत मकर राशीत प्रवेश करेल. शनीची ही स्थिती अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात शुभ प्रभाव टाकू शकते. शनि मकर राशीत प्रवेश करताच दोन राशीच्या लोकांना काही काळासाठी शनी देवाच्या नजरेमधून मुक्ती मिळेल.
‘या’ दोन राशींवरचा प्रभाव होईल कमी
शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहेत. कर्क आणि वृश्चिक राशींच्या लोकांवर शनी ढैय्या सुरु आहे. या राशीच्या लोकांवर २९ एप्रिलपासून शनीची महादशा आहे. शनी राशीच्या बदलाने मिथुन आणि तूळ राशीवर शनिवरचा प्रभाव संपला. पण शनि मकर राशीत प्रवेश करताच मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांवर शनिचा प्रभाव सुरु होईल. यासोबतच कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांना शनिचा प्रभावापासून आराम मिळेल.
(हे ही वाचा: Powerful Zodiac Sign: ‘या’ दोन राशी मानल्या जातात सर्वात शक्तिशाली!)
मिळेल अपार यश
१२ जुलै रोजी शनीने राशी बदलताच कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांचा त्रास संपुष्टात येईल. त्यांना कामात यश मिळू शकते. नोकरी शोधणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळू शकतात. पदोन्नती आणि प्रगतीची संधी मिळेल. शारीरिक आणि मानसिक ताण कमी होईल. या दरम्यान तुम्ही जे काही काम हाती घ्याल, त्यात तुम्हाला यश मिळेल.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)