November Horoscope 2023 : नोव्हेंबर महिना प्रत्येक राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. कारण या महिन्याच्या सुरुवातीला शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे. तर शनिदेव मार्गी होणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव कुंभ राशीत विराजमान आहेत. अशा स्थितीत शश योग बनणार आहे, यासह नोव्हेंबर महिन्यात चंमा मेष राशीत प्रवेश करणार आहे. जिथे गुरु आधीच विराजमान आहे. त्यामुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. या दोन शुभ राजयोगांच्या निर्मितीमुळे अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद येऊ शकतो. तर कोणत्या राशींसाठी नोव्हेंबर महिना शुभ ठरु शकतो ते जाणून घेऊ.

मिथुन रास (Mithun Zodiac)

venus and saturn conjunction 2024 in marathi
डिसेंबरपर्यंत ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळणार बक्कळ पैसा! शुक्र अन् शनिदेवाच्या कृपेने चमकणार नशीब, मानसन्मानात होईल वाढ
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Shukra Nakshatra Gochar 2024
१३ सप्टेंबरपासून पालटणार ‘या’ तीन राशीधारकांचे नशीब, शुक्र नक्षत्रामुळे अपार धनलाभ
surya gochar 2024 After 364 days Sun will enter Virgo sign
नुसता पैसा! ३६१ दिवसांनंतर सूर्य करणार कन्या राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी
dengue malaria
कल्याण-डोंबिवलीत दोन महिन्यांत डेंग्यू, मलेरियाचे ३८७ रूग्ण; संशयित २० हजार नागरिकांच्या रक्ताची तपासणी
cases of dengue, Mumbai, chikungunya, lepto,
मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ
tanishq and de beers collaboration to boost India s natural diamond jewellery market
डी बीयर्सशी भागीदारीतून हिऱ्यांच्या ग्राहकांमध्ये दुपटीने वाढीचे तनिष्कचे लक्ष्य
Paytm share price
Paytm Share Price: पेटीएमच्या शेअरमध्ये १२ टक्क्यांची वाढ; पंतप्रधान मोदींनी क्युआर कोडची स्तुती केल्याबद्दल मानले आभार

नोव्हेंबर महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. काही समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास करिअर आणि व्यवसायात खूप फायदा होऊ शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे लोकांना या काळात यश मिळू शकते. तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार महिलांच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. तसेच या काळात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो. व्यवसायिकांचा या काळात भरपूर फायदा होऊ शकतो.

कर्क रास (Kark Zodiac)

कर्क राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना खूप खास ठरु शकतो. या महिन्यात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते, त्यामुळे तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. या काळात तुम्ही कोणत्याही व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत केला तर त्यातून तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहू शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळू शकते.

हेही वाचा- ३ नोव्हेंबरपासून ‘या’ ४ राशींना होणार बक्कळ धनलाभ? शुक्रदेव गोचर करताच होऊ शकतो मोठा आर्थिक लाभ

मकर रास (Makar Zodiac)

मकर राशीच्या लोकांसाठीही नोव्हेंबर महिना खास ठरू शकतो. या काळात कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता. नशिबाने साथ दिल्यास तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. करिअरमध्येही प्रगतीची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमचे प्रमोशन होऊ शकते. अनेक प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)