हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे. श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकराची विधिवत पूजा केली जाते. श्रावण महिन्यात सूर्य देव कर्क राशीत वास करतो. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, श्रावण महिन्यात काही राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा असेल. या ५ राशींना श्रावण महिन्यात सुर्यदेवाचा आशीर्वाद मिळेल. सुर्यदेवाच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांच्या आयुष्यात देखील चांगले बदल होतील. चला तर मग जाणून घेऊया श्रावण महिन्यात सूर्य देव कोणत्या राशींवर कृपा करेल आणि त्यांच्या आयुष्यात विशेष काय बदल घडतील.

वृषभ

वृषभ राशी असणाऱ्या व्यक्तींना कार्यक्षेत्रात यश मिळेल. शिक्षण क्षेत्राशी निगडित लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही. या राशीच्या लोकांची आर्थिक बाजू मजबूत राहील. तसंच त्यांच्या कामाचे देखील कौतुक होईल. या राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. श्रावण महिन्याच्या काळात तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. तसंच तुम्ही ज्या ठिकाणी नोकरी करत असाल, त्याठिकाणी तुमच्या प्रतिष्ठेत आणि पदात वाढ होईल.

13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
Shani-Mercury kendra drishti
२७ डिसेंबरपासून ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; शनी-बुधाची केंद्र दृष्टी देणार भरपूर पैसा
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला मिळेल प्रार्थनेचे फळ तर व्यवसायिकांचा असेल सोन्याचा दिवस, वाचा तुमचे राशिभविष्य
difference between shivlinga jyotirlinga
शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय?
Guru gochar gajkesari rajyog horoscope 2025 in marathi
२०२५ चा गजकेसरी राजयोग ‘या’ तीन राशींची करु शकतो आर्थिक भरभराट, हत्तीवरुन वाटाल साखर

( हे ही वाचा: Shravan 2022: श्रावणाचा पवित्र महिना लवकरच सुरू होतोय; जाणून घ्या उपवासाच्या खास टिप्स)

मिथुन

मिथुन राशी असणाऱ्या लोकांना व्यवहारासाठी हा चांगला काळ आहे. यावेळी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. या कालावधीत पैसा आणि नफा होईल, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. तसंच नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची देखील शक्यता आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही.

तूळ

हे संक्रमण तुमच्या जीवनात आनंद आणि प्रगती आणेल. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांसाठी ही वेळ शुभ आहे. या काळात पदोन्नतीची शक्यताही निर्माण होऊ शकते. तसंच या लोकांचे वैवाहिक जीवन सुद्धा आनंदी राहील. जर तुम्ही नोकरी करत असाल, तर कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे सर्वजण कौतुक करतील.

( हे ही वाचा: ‘या’ तीन राशींवर पुढील ६ महिने शनिदेवाची कृपा राहील; कोणतेही अशुभ परिणाम दिसणार नाहीत)

कन्यारास

कन्या रास असणाऱ्या व्यक्तींना या कालावधीत पैसा आणि नफा होईल, ज्यामुळे आर्थिक बाजू मजबूत होईल. नोकरी आणि व्यवसायासाठी वेळ वरदानापेक्षा कमी नाही. मान-सन्मान, पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील.
या कालावधीत तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा.

मीन

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ आहे. कठोर परिश्रम केल्याने तुम्हाला कामात नक्कीच यश मिळेल.धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. या कालावधीत तुमचं कौटुंबिक जीवन आनंदी राहील. तसंच तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवाल. ज्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील.

Story img Loader